पद्म पुरस्कारांसाठी ठाकरे सरकारने संजय राऊंतांसह ‘या’ १०० नावांची केली शिफारस; मिळाला मात्र एक

मुंबई । केंद्र सरकारकडून 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सहा दिग्गजांचा समावेश आहे. परंतु राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. पण, त्यातील केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला. शिवाय, सिंधुताईंना पद्मभूषण द्यावे, अशी शिफारस राज्याने केली होती. मात्र, त्यांना पद्मश्रीने गौरविले … Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य

मुंबई । राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं. “नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य … Read more

कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं? हे चुकून इकडं आलेत; राणेंची जहरी टीका

मुंबई । घरातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित चालवतो. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं सूचक वक्तव्य … Read more

‘बाळासाहेबां’साठी उद्धव आणि राज एकत्र येणार; ‘हे’ आहे कारण

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारीला दक्षिण मुंबईत होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे … Read more

‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा एक हजार पार’-ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

गडचिरोली | जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर १९९३ मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. सलग २७ वर्ष टिकून असलेल्या दारूबंदीला धक्का लागण्याची शक्यता बळावली असता जिल्ह्यातील १ हजार २ गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत. या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा, असे पत्र देखील या गावांनी शासनाला लिहिले आहे. सद्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

“पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत”; फडणवीसांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुंबई । कांजूरमार्गवरील मेट्रो प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजप आणि शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादात केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न केले आहेत. तसेच या विषयासंदर्भात खासदार शरद … Read more

पदवीधर,शिक्षक मतदारसंघातील पराभवानंतर भाजपच्या ‘ऑपरेशन लोट्स’चे ‘तीन तेरा..’

मुंबई । पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या लिटमस टेस्टमध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाल्याने या आघाडीचं बळ वाढलं आहे. तर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांनी पदवीधरच्या 6 पैकी 4 जागांचं दान आघाडीच्या पदरात पाडल्यानं भाजपला सपशेल नाकारल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या विजनानंतर भाजप नेत्यांच्या ‘ऑपरेशन कमळ’च्या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. याशिवाय आपलीच सत्ता … Read more

ठाकरे सरकार वाड्या-वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार, कॅबिनेट बैठकीत घेतले ‘हे’ ७ महत्वाचे निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यावरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत एकूण सात निर्णयांना मान्यता देण्यात आली. 1) सामाजिक आणि न्याय विशेष सहाय्य विभाग राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय … Read more

महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही, गडकरींची जोरदार टीका

नागपूर । ”महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही,” असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचं गडकरी म्हणाले. ‘नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची … Read more

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवबंधन बांधणार; शिवसेनाप्रवेशानंतर मोठे खुलासे करण्याची शक्यता

मुंबई । काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जात उर्मिला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. मात्र भेटीची वेळ अद्याप ठरलेली नाही. तर दुपारी 4 वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. लोकसभा … Read more