वृत्तसंस्था। एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्ताची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंबंधी सुनावणी घेतली आहे. दिल्लीमधील एका रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरु असल्याचे एका वृत्तवाहिनीने निदर्शनास आणून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर परिस्थितीचे रुग्णालयांनी उत्तर दिले पाहिजे असे म्हंटले आहे. दिल्लीसोबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारलाही नोटीस बजावली आहे. मात्र मुंबईत दरदिवशी होणाऱ्या तपासण्यांचे कौतुकही त्यांनी केले आहे.
दिल्ली, महाराष्ट्र यासोबत तामिळनाडू, तसेच पश्चिम बंगाललाही सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, संजय किशन कौल आणि एम आर शाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली. रुग्णांची वाढती संख्या आणि कमी प्रमाणातील चाचण्यांचे उत्तर मागत सर्वोच्च न्यायालायने दिल्ली सरकारला स्पष्टीकरण मागितले आहे. तर मुंबईत १६ ते १७ हजार चाचण्या होत असताना तुलनेने केवळ सात हजार चाचण्या केल्या जात असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे. प्रसारमाध्यमांनी ही माहिती समोर आणल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे.
A three-judge bench of Supreme Court starts hearing case regarding lapses in proper treatment of #COVID19 patients and dignified handling of bodies after taking suo motu cognisance of the matter.
Justice Shah says,’Dead bodies are being put like this,what is this going on?’ pic.twitter.com/Y4nhcQdr5v
— ANI (@ANI) June 12, 2020
“दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये रोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला १० हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत असताना चाचण्यांची संख्या कमी का केली जात आहे ? चाचण्या न करणे हा पर्याय नाही. चाचण्या वाढवणे हे राज्यांचं कर्तव्य आहे, जेणेकरुन लोकांना राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती मिळेल,” असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. करोना रुग्णांना मिळणारे उपचार आणि मृतदेहांची होणारी हेळसांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस पाठवली आहे. तसंच चाचण्यांची संख्या कमी होत असल्याचीही दखल घेतली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारसबोत दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारला नोटीस पाठवली आहे. १७ जून रोजी याप्रकऱणी पुढील सुनावणी होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.