हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी खासदार निलेश राणे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून ते नेहमी कार्यरत असतात. कोकणात सध्या कोरोना सोबत नुकत्याच येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासन व स्थानिक लोप्रतिनिधींनी रत्नागिरी जिल्ह्याचा सत्यानाश करतायेत असा आरोप करत कोकण आयुक्ताना पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून याची माहिती दिली आहे.
या पत्रात त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हंटले आहे. कोरोना च्या नमुन्यांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेली प्रयोगशाळा अनेकदा बंद पडली आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाकडून लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यात २ लाखांहून अधिक लोक परजिल्ह्यातून आले असताना केवळ १ लाख ६३ हजार ५४३ इतकीच संख्या दाखविण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे. यासोबतच लॅब मध्ये ५०० नमुने तपासण्याची सोया असताना देखील २३ मार्च ते ३० जून कालावधीत केवळ ९ हजार ७४९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. जे सरासरी १५०-२०० प्रतिदिन होतात असे म्हणत प्रशासन हे दुर्लक्षित करत असल्याचा आरोप केला आहे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासन व स्थानिक लोप्रतिनिधींनी रत्नागिरी जिल्ह्याचा सत्यानाश करतायेत. कोकण आयुक्त यांना पत्र लिहून रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती पत्राद्वारे कळवली आहे. pic.twitter.com/Y2zn7EyExg
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 3, 2020
जिल्ह्यात नमुने तपासणीच्या मशीन बंद पडणे, संस्थात्मक विलगीकरणासाठी निवारा उपलब्ध नसणे, कोणत्याही तपासणीशिवाय लोकांना जिल्ह्यात प्रवेश देणे या गोष्टींमुळेच जिल्हा कोरोना नियंत्रणात अपयशी ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ३ जून रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची देखील खोटी माहिती जाहीर करण्यात आली असून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. या वादळात मच्छिमारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र त्यांना खूपच कमी मदत जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी या पत्रात म्हंटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.