राहुल बोन्द्रे यांच्या भाजप प्रवेशाला चिखलीत भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

बुलडाणा प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय खलबतांनी जोर पकडला आहे. जो तो आपली जागा शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नात असून विचारधारा पक्षनिष्ठा या सगळ्यांना फाट्यावर मारत अनेक नेते भाजप सेनेत प्रवेश करत आहेत. या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इनकमिंग मुळे निष्ठावंत मात्र यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आहेत. अशाच … Read more

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा वंचितच्या सर्व पदांचा राजीनामा

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सांगली मध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे निष्कलंक आणि चारित्र्यवान नेते असल्याचंही जाता जाता त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या राजीनाम्यामुळे … Read more

पंतप्रधान मोदींनी दिल्या मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचा आज ८७ वा वाढदिवस. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या मनमोहन सिंग यांना देशाच्या आर्थिक सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणून ओळखलं जातं. वाढदिवसानिमित्त देशभरातून मनमोहन सिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्रीच ट्विटरवरून डॉ मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्याला उत्तम … Read more

मग… मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडी च्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे जसा पवारांवर गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.’ असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद यांच्यावर … Read more

खडसेंनी केली पवारांची पाठराखण ; म्हणाले बँक घोटाळ्याशी पवारांचा काय संबंध

मुंबई प्रतिनिधी | राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्या संदर्भात काल ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून राज्यभर भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. याच संदर्भात भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपण विरोधी पक्ष नेते पदावर असतानाच या प्रकरणाला सुरुवात झाली. या प्रकरणाच्या संदर्भात … Read more

या ५ जागांवर युतीचे पुन्हा आडले

मुंबई प्रतिनिधी | भाजप आणि शिवसेना युतीच्या बैठक युद्ध पातळीवर होत असून भाजप आणि शिवसेना युती कोणत्याही परिस्थितीत करायचीच असा निर्धारच दोन्ही पक्षांनी केला आहे. शिवसेना देखील वाटाघाटीच्या मुद्द्यांवर नरमली असून आता फक्त सहा जागांवर भाजप शिवसेनेचा युतीचा तोडगा बाकी असल्याची चर्चा आहे. औसा – लातूर जिल्हा, वडाळा- मुंबई, एरोली – ठाणे, बेलापूर – ठाणे, … Read more

राजू शेट्टींना दणका : स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर करणार भाजपात प्रवेश

मुंबई प्रतिनिधी |  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय रविकांत तुपकर भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात तुपकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील बोलले जाते आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तरुण चेहरा होते. त्याच प्रमाणे त्यांचा … Read more

मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना हवी असणारी माहिती देणार : शरद पवार

मुंबई प्रतिनिधी |  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी आज मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका विस्ताराने मांडली आहे. मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना हवी असणारी माहिती देणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. महिनाभर मुंबईत … Read more

शिवस्मारकाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबई प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री कार्यालयातून शिवस्मारकाचे एलएनटीला काम देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. सरकारची सर्व कामे एलएनटीला का मिळत आहेत.?? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात कॅगने आक्षेप घेतला असून मंत्रालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्या’चा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे. शिवस्मारकाच्या कामकाजावरून राष्ट्रवादीने … Read more

लोकसभा पोटनिवडणूक : उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस आघाडीचे उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निडणुकीच्या सोबत लागणार आहे. त्यामुळे उदयनराजे यांना तोडीस तोड उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने हि जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उभा राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. [youtube https://www.youtube.com/watch?v=fnU1IHkp9iY&w=560&h=315] … Read more