दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्सची माणसं पोहचतातच कशी? – शरद पवार

चंद्रकांत पाटील यांनी पवारांना घरभेदी अशी उपमा दिली होती, शिवाय पवारांनी जे पेरलं तेच उगवलं असा उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी मीच गोपीनाथ मुंडेंना भाजप सोडू नका असं सांगितलं होतं असं स्पष्टीकरण दिलं.

देशभर विजयादशमीचा उत्साह, नागपूरात संघाचे विशेष संचलन संपन्न

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष कार्यक्रम सकाळी ७ वाजताच सुरू झाला होता. संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक पद्धतीने आपलं संचलन आज सादर केलं. रा

देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ?? प्रतिज्ञापत्रात सापडली ‘ही’ गंभीर चूक 

निवडणुकीसाठी भरण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वाधिक महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

पुणेरी पाट्या लावून चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला पुणेकरांनी केला विरोध

पुणे प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या उमेदवारीला मेधा कुलकर्णींच्या कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्याच प्रमाणे कोथरूड मधील ब्राह्मण वर्गाने देखील त्यांच्या उमेदवारीला विरोध केला असल्याची चर्चा कोथरूड मध्ये जोर धरू लागली आहे. अशा सर्व नाट्यमय हालचाली होत असतानाच आता कोथरूडमध्ये पुणेरी पाट्या देखील झळकल्या आहेत. पुणेरी … Read more

‘या’ १८ आमदारांना भाजपनेच नाकारले; पक्षांतर्गत विरोधक कमी करण्यात फडणवीसांना यश

मुंबई प्रतिनिधी | २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपात भाजपकडून तब्बल १८ विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यातील अनेकजण हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ पक्षामध्ये सक्रिय राहिले आहेत. निष्ठवंतांना डावलून आयारामांना किंवा डावलण्यात आलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तिकिट देण्यात आले आहे. नाराज विद्यमान आमदारांपैकी काही जणांनी बंडखोरी केली असून काहींनी पक्षनिष्ठ राहण्यावरच भर … Read more

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

मावळ विधानसभा : भाजपच्या बाळा भेगडेंच्या उमेदवारीला बंडाळीचे ग्रहण ; भाजपच्या सुनील शेळकेना राष्ट्रवादीची उमेदवारी

पुणे प्रतिनिधी | भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ बंडखोरीच्या कृत्याने चर्चेत येणार आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत बाळा भेगडे यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता असतानाच भाजपने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे सुनील शेळके राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देखील जाहीर केली आहे. भाजपने या आधी मावळ विधानसभा मतदारसंघातून एका … Read more

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उमेदवारी जाहीर करण्याबाबत इतर सर्व पक्षांना मागे टाकत मंगळवारी सकाळी भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. विद्यमान १२ आमदारांचा यातून पत्ता कट करण्यात आला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश जणांना उमेदवारी मिळाली आहे.

बारामतीतून पडळकरांच्या उमेदवारीचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई प्रतिनिधी | वंचितला सोडचिठ्ठी दिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडलकरांना बारामतीतून मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. गोपीचंद पडळकर वाघ आहेत. त्यांनी जंगलाचा राजा असल्या सारखे राहिले पाहिजे. गोपीचंद पडळकरांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे … Read more

राज्यातल्या जनतेनं या सरकारचं काय घोडं मारलंय? – मुंडे

पुणे प्रतिनिधी। विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष केलं आहे. धनंजय मुंढे यांनी पुण्यात पावसामुळे तयार झालेल्या भीषण परिस्थितीबाबत आपल्या ट्विटर हँडल वरून मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे ट्विट नुकतेच केलं आहे. ‘पुणे आणि परिसरात प्रचंड पाऊस झाल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झालीय. ११ लोकांचा मृत्यू झालाय … Read more