एकेकाळी दिवसाला मिळत होती 35 रुपये मजुरी, त्यानंतर भारताला जिंकवून दिला २०११ चा वर्ल्ड कप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |गुजरात मधील इखार या अज्ञात खेड्यातून येऊन कोणी 28 वर्षानंतर २०११ च्या विश्वकरंडक जिंकण्यात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असे कुणाला स्वप्नातही वाटणार नाही.पण हे खरं आहे. ही गोष्ट आहे भारतचा जलदगती गोलंदाज मुनाफ पटेल याची. दररोज मजुरी करणारा एक मजूर ते भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज होण्याचा त्याचा हा प्रवास एखाद्या सुंदर स्वप्नातून … Read more

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

‘क्रिकेटचा दादा’ सौरव गांगुली झाला ४८ वर्षांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरभ गांगुली. कोलकात्याचा वाघ म्हणून भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेला बेदरकार कर्णधार. असा कर्णधार ज्याने बलाढ्य संघांविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना हिंमतीने उभं राहायला शिकवलं, असा खेळाडू ज्याने प्रतिस्पर्ध्यालाही त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक ठेवली आणि असा माणूस ज्याने भारतीय क्रिकेटची २० वर्षांहून अधिक काळ सेवा करताना जागतिक पटलावर भारताला एक नवी … Read more

धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या पोहोचला थेट त्याच्या रांचीच्या घरी; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर केवळ धोनीचीच हवा दिसून येते आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील … Read more

विराट- हार्दिकचा पुशअप्स चॅलेंज व्हिडिओ व्हायरल, नताशाने केली राॅमेंटीक कमेंट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हार्दिक पांड्या तसा अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. त्याच्या फिटनेसच्या बाबतीत तो नेहमीच काळजी घेत असतो. अनेकदा आपले जिममधील वर्कआउट चे व्हिडिओ तो अपलोड करत असतो. हार्दिक आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून एक असाच व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो पुशअप्स मारताना दिसत आहे. त्याच्या या पुशअप्सची चाहत्यांना भुरळ पडली आहे. अनेकजण त्याच्या या व्हिडिओच्या … Read more

आणि इरफान पठाण ‘त्या’ तरुणीच्या कमेंटमुळे झाला दुःखी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इरफान पठाण याने नुकतेच एका मुलाखतीत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर आणि माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना त्याचे करिअर खराब करण्यासाठी दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे म्हंटले होते. त्याच्या या वक्तव्यामुळे तो चर्चेत होता. एका वृत्तवाहिनीने त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून त्याचे हे विधान प्रसारित केले होते. यावर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. त्यावर एका तरुणीने केलेल्या … Read more

शशांक मनोहर यांनी आयसीसीचे अध्यक्षपद सोडले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसीचे माळवते अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दोन वेळा दोन वर्षांचा कार्यकाळ सांभाळल्यानंतर अखेर बुधवारी आयसीसीचे अध्यक्षपद सोडले आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या अध्यक्षनिवडीपर्यंत उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा हे उत्तराधिकारी असणार आहेत. ते या परिषदेचा कारभार सांभाळतील अशी माहिती देण्यात आली आहे. आयसीसी बोर्ड, कर्मचारी आणि संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या … Read more

‘कर्णधार झाल्यानंतरही खेळण्याची पद्धत मी बदलणार नाही’- बेन स्टोक्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार जो रुटच्या अनुपस्थितीत इंग्लंडचे कर्णधारपद मिळवले असले तरीही आपली खेळण्याची पद्धत बदलणार नाही, असे स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याने सांगितले आहे. आपल्या दुसर्‍या मुलाच्या जन्मामुळे 8 जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत रूट खेळणार नाही आहे, त्याच्या जागी आता स्टोक्स कर्णधारपद सांभाळू शकेल. स्टोक्सने … Read more

इंग्लंडच्या इयान बोथमने सांगितले की,’गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटीच त्याला कोरोना संसर्ग झाला होता’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बोथम म्हणाले की,’ गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता मात्रत्यांच्या तो लक्षातच आला नाही. बोथम म्हणाले की, त्यांना हा फ्लू वाटलं होता परंतु प्रत्यक्षात तो कोरोनाचा संसर्ग होता. कोरोना विषाणूच्या या साथीच्या आजारामुळे जगभरातील क्रिकेटच्या स्पर्धांना ब्रेक लागलेला आहे. अनेक स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिका … Read more

‘या’ युवा भारतीय अंपायरला आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये मिळाले विशेष स्थान; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात कोरोनामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना आपल्या संघाचा विजय पाहण्याची संधी मिळत नाही आहे, मात्र भारताचे युवा पंच नितीन मेनन यांनी भारतीय चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली आहे. भारताचे युवा पंच नितीन मेनन यांना इंग्लंडच्या निजेल लाँगच्या जागी 2020-21 च्या मोसमात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पंचांच्या एलिट पॅनलमध्ये स्थान देण्यात आले … Read more