केंद्र सरकारचे आदेश डावलून विमान कंपन्यांची तिकिट बुकिंग सुरु

नवी दिल्ली । केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जोपर्यंत करोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात येत नाही तोपर्यंत एकही विमान उड्डाण घेणार नाही, असे स्पष्ट केले होते. सध्या देशात करोना विषाणूची साथ रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र तरीही विमान कंपन्यांकडून मे आणि जून महिन्यातील आगाऊ तिकीट बुकिंग स्वीकारली जात असल्याचे समोर … Read more

कोरोनाच्या संकटात कोणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये; गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान

नवी दिल्ली । ”आपला देश करोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये” असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजपा नेत्यांचे कानच टोचले आहेत. “एखादा मुद्दा पटला नसेल तर त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा. सध्याची वेळ ही एकजुटीने कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची आहे, असं गडकरी यांनी एका मराठी … Read more

आपल्या चप्पलांसोबत कोरोना घरात येऊ शकतो काय? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या प्रकरणांची संख्या ३५ लाख ६० हजारांच्या वर गेलेली आहे, तर १ लाख ७७ हजार लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अशा परिस्थितीत, विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीवर काम करण्याबरोबरच हे व्हायरस किती काळ टिकू शकते जेणेकरून संसर्ग थांबवता येईल, हे पाहिले जात आहे. दरम्यान, पुन्हा पुन्हा प्रश्न उपस्थित होतो आहे … Read more

कोरोनावरुन अमेरिकेत चीन विरुद्ध पहिली केस दाखल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेला धोक्यात आणल्याच्या आरोपावरून चीनविरूद्ध अमेरिकेत पहिला दावा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चीनविरूद्ध कायद्याचा आधार घेणारे मिसुरी हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे.या खटल्यात चीनने कोरोना विषाणूची जाणीवपूर्वक माहिती लपवून ठेवली,याबाबत सतर्क करणाऱ्यांना अटक केली आणि हा आजार संसर्गजन्य असल्याची शक्यता नाकारल्याचा आरोप करण्यात आला आणि … Read more

धक्कादायक! चीनमधून आयात केलेले कोरोना टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे; राजस्थान सरकारचा दावा

जयपूर । चीनमधून आयात केलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे येत असल्याचा खळबळजनक दावा राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजस्थान सरकारनं चीननं पाठवलेल्या या किट्सचा वापर करणं थांबवलं आहे. यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे रिपोर्टही चीनमधून आयात … Read more

देशातील कोरोनाबाधीतांची संख्या १८ हजार ६०१ वर, ५९० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना बळींची एकूण संख्या आता १८,६०१ वर पोहोचली आहे.शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यातील १४,७५९ अद्यापही कोविड -१९ विषाणूमुळे पीडित आहेत. उपचारानंतर सुमारे ३२५१ रुग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे,परंतु मृतांचा आकडा मात्र ५९० वर पोहोचला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अंदमान आणि निकोबारमधील कोरोनाग्रस्त लोकांची संख्या आता १६ … Read more

कोरोनाव्हायरस पोहोचला न्यूक्लियर लाँचपॅडवर,यूएस-फ्रान्स कमांडवर प्रश्न उपस्थित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत दररोज दोन हजाराहून अधिक लोकांचा बळी जात आहे आणि दररोज सुमारे २५ ते ३० हजार नवीन रुग्ण समोर येत आहेत. अमेरिकेसाठी हा विषाणू केवळ जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही एक आव्हान बनला आहे. त्याच वेळी, जगातील दोन न्यूक्लियर पॉवरचे लॉन्च पॅड कोरोनाला पॉझिटिव्ह आले आहे. हे लॉन्च पॅड आहेत … Read more

लहान मुलांना कोरोनापासून कसं दूर ठेवावं? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरस संक्रमितांची आणि मृत्यूची संख्या सातत्याने वाढतच आहे.शनिवारी या आजाराने देशातील सर्वात तरुण कोरोना संक्रमित मुलाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कलावती शरण मुलांच्या रूग्णालयात कोरोना संक्रमणामुळे केवळ ४५ दिवसांच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला.या मुलाला आयसीयूमध्ये दाखल केले गेले होते. मुलाचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.आता रुग्णालय प्रशासन तपासणी करीत आहे की … Read more

कॅनडामध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या बंदूकधार्‍याकडून गोळीबार;१६ लोक ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतातील भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलिस अधिकाऱ्याच्या वेषात आलेल्या एका बंदूकधार्‍याने गोळीबार केला आणि घरे नष्ट केली यामध्ये १६ लोक ठार झाले.रविवारी झालेला हा हल्ला या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा प्राणघातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, संशयित हल्लेखोरही ठार झाला आहे.मृतांमध्ये एक पोलिस अधिकारीही आहे. पोलिसांनी सांगितले … Read more

दिलासादायक! ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केली आपलं राज्य करोनामुक्त झाल्याची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील बहुतांश राज्य कोरोनाशी झगडत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू व इतर राज्यात परिस्थिती गंभीर आहे. या राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशात गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपलं राज्य कोरोनमुक्त झाल्याची दिलासादायक माहिती दिली आहे. रविवारी गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. गोव्यामध्ये कोरोनाचे ७ … Read more