महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उमेदवारी जाहीर करण्याबाबत इतर सर्व पक्षांना मागे टाकत मंगळवारी सकाळी भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. विद्यमान १२ आमदारांचा यातून पत्ता कट करण्यात आला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश जणांना उमेदवारी मिळाली आहे.

अनुभवी मिशीवाला उदयन भोसलेंना भारी पडणार का??

सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी उदयन भोसलेंच्या विरुद्ध लढणार आहे. ज्या नेत्याला लोकांनी दिलेल्या मतदारांचा आदर करता येत नाही तो लोकांसाठी काय काम करणार असा टोलाही यावेळी श्रीनिवास पाटील यांनी लगावला.

सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे विरुद्ध संबीत पात्रा जुगलबंदी रंगली

हाराष्ट्र ही शिवरायांची भूमी असून त्याकाळी शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला होता. देशाचे माजी गृहमंत्री मात्र पाकिस्तानातल्या शाहिस्तेखानाला मदत करत असून हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही असंही पात्रा यावेळी म्हणाले.

भव्य शक्तिप्रदर्शन करत शंकरराव गडाखांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदार संघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उदयन भोसलेंच्या मुलाचा अनोखा पराक्रम ; १४ व्या वर्षी आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धेचं प्रमाणपत्र

छत्रपती शिवरायांचे चौदावे वंशज आणि उदयन भोसले यांचे चिरंजीव विरप्रताप याने नुकत्याच थायलंडमधील फुकेट येथे झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता. अवघ्या चौदाव्या वर्षी या स्पर्धेत त्याने प्रमाणपत्र मिळवले आहे.

पनवेल महापालिकेचं चाललंय काय ? प्रदूषणाविरुद्धची कार्यवाही अजूनही अहवालातच अडकलेली

वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांनी पनवेल शहराचं आणि त्यायोगे शहरांचा आसरा घेतलेल्या चाकरमान्यांचं आयुष्य दिवसेंदिवस जर्जर होत आहे. ३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पनवेल महापालिकेचा पर्यावरण अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामध्ये काही त्रुटी सापडल्याने सुधारणा करून नवीन अहवाल सादर होणे आवश्यक होते.

ह्युस्टनमध्ये भारतीय वंशाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची हत्या

ह्युस्टन | परदेशातील शीख भारतीय व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.अमेरिकेतील ह्युस्टन इथे अमेरिकेचे पहिले पगडीधारक शीख पोलीस अधिकारी संदीप सिंग धालीवाल यांची शुक्रवारी अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. ह्युस्टन येथील नॉर्थ वेस्ट हॅरिसजवळच्या ट्रॅफिक सिग्नलवर ही घटना घडली असून या घटनेने अमेरिकेसह भारतात खळबळ उडाली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी … Read more

ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर शरद पवार म्हणतात

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण ईडीच्या कार्यालयात जाणार आहे असे शरद पवार स्वतः म्हणाले होते. त्यानंतर ते आज जाणार देखील होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले त्यानंतर … Read more

परभणीत जिल्ह्यात नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार

परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून ऑक्टोबर महिन्यांमधील 21 तारखेला संपूर्ण राज्यांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे. पण मागील पंचवार्षिक मध्ये गावागावात जाऊन पाच वर्षात गाव व तालुक्‍याचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याचे आश्वासन नेतेमंडळींनी दिले होते. सदरील आश्वासने हवेतच विरले गेल्याने , पाच वर्षानंतर विकासापासून दूर राहिल्याची भावना निर्माण झाल्याने जिल्ह्यातील … Read more

वडनेर ग्रामिण रुग्णालयाचा भोंगळ कारभार, नागरीकांची कारवाईची मागणी

वर्धा प्रतिनिधी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या वडनेर गावात नागरीकांना योग्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने भव्य सुसज्य बांधले. सोबतच रुग्णांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र येथील, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे येथील रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे नागरीकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. रुग्णालयातील संपुर्ण प्रकार‌ नागरीकांनी … Read more