दहशतवादाविरुद्ध भारत आता अधिक आक्रमक – एअर चीफ मार्शल भादुरीया; वायुसेना दिवसानिमित्त देशभर उत्साह

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भादुरीया यांनीही वायसेनेला सदिच्छा देताना बालाकोट मधील कारवाई ही दोन देशातील राजकीय तणाव दूर करून दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं.

देशभर विजयादशमीचा उत्साह, नागपूरात संघाचे विशेष संचलन संपन्न

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष कार्यक्रम सकाळी ७ वाजताच सुरू झाला होता. संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक पद्धतीने आपलं संचलन आज सादर केलं. रा

चंद्रकांत पाटील युतीमधून बाहेर, एकनाथ खडसेंच्या मुलीविरुद्ध राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का! १४ नगरसेवकांनी दिला भाजपला पाठींबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या १४ नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मित्रपक्षांचा गेम करत भाजपने बळकावल्या परभणीतील २ जागा; ४ मतदारसंघात ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

परभणी जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.

ना अजित, ना सुप्रिया; ‘हा’ असणार शरद पवारांचा राजकीय वारस

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय वारसाची घोषणा केली आहे. एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखती दरम्यान पवार यांना तुमचा राजकीय वारस कोण असणार असा प्रश्न केला असता पवार यांनी त्यावर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे नाव न घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पवार … Read more

जालन्यात प्रकाश आंबेडकरांच्या अटकेचे पडसाद, ‘वंचितसेना’ रस्त्यावर

आरे येथील जंगलतोडी विरोधात रस्त्यावर उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज जालन्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली.

आम्हाला विकत घेतो काय? शेतकर्‍यांच्या पोरांचा सुजय विखेंना २ हजाराचा चेक

तुमच्या २ हजार रुपयांची भीक आम्हाला नको अस उत्तर देतानाच शेतकऱ्याने २ हजार रुपयांचा चेकही सुजय विखेंच्या नावाने पाठवला आहे.

मत मिळत नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर

जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना अकोला निकळक गावातील भर सभेत अश्रू अनावर झालेत. ‘गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. मतदार संघातील जनतेच्या सोडवता आल्या तेवढ्या समस्या सोडवल्या. लोकांच्या सुख आणि दुःखात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मतदान पडतं’ असं सांगत चौधरी यांनी यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केलं.

महाराष्ट्रात शत्रुघ्न सिन्हा करणार विरोधकांना ‘खामोश’

एकेकाळी भाजपची स्टार शॉटगन असणारे शत्रुघ्न सिन्हा आता काँग्रेसच्या बाजूने विरोधकांना खामोश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचाराच्या राजकीय शिमग्यात विरोधाकांना प्रचारात नामोहरम करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हांच्या रूपाने काँग्रेसला त्याच्यासाठी नवा चेहरा मिळाला आहे.