Birthday Boy च्या ‘त्या’ प्रश्नावर पुणे पोलिसांचा भन्नाट रिप्लाय !

Pune Police

पुणे : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या देशात दररोज ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी राज्याचे पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या … Read more

शोएब अख्तरने आयपीएल संदर्भात BCCI ला दिला ‘हा’ सल्ला

shoaib akhtar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारताने कोरोनाच्या संकटातमुळे आयपीएलला स्थगिती द्यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने दिला आहे. सध्या कोरोना वायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशामध्ये रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूची संख्या २ हजारच्या आसपास असते. आयपीएल खेळवण्यावर … Read more

आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

BCCI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमधून आर. अश्विन याच्यासह चार विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. खेळाडू आयपीएलमधून माघार घेत असल्याने आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. त्यावर आता BCCI ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले बीसीसीआय … Read more

कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे नैराश्यातून वृद्धाची आत्महत्या

बारामती : हॅलो महाराष्ट्र – इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका रुग्णाने कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे आत्महत्या केली आहे. मागच्या ४ – ५ दिवसांपासून त्या रुग्णाला अंगदुखी, घसादुखी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांना कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. प्रकाश विष्णूपंत भगत असे आत्महत्या केलेल्या … Read more

अभिनेत्रीचा मास्क न लावता आमदारासोबत डान्स; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात तर रुग्णांची आकडेवारी हजारोंच्या संख्येनं वाढताना दिसत आहे. इतक्या लोकांना देण्यासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाची ही वाढती साखळी तोडण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. मात्र काही मंडळी या निर्बंधांकडं दुर्लक्ष करुन घराबाहेर पडताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध अभिनेत्री … Read more

पद्मभूषण राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन

Rajan Mishra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान यांची प्राणज्योत मालवली. राजन मिश्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही वेळापूर्वी त्यांना ऑक्सीजन बेड मिळावा यासाठी ट्विटरवर काही लोकांनी मागणी केली होती. त्यानुसार संजीव गुप्ता या आयएएस अधिकाऱ्याने प्रयत्न करून त्यांना सेंट स्टीफन्स … Read more

रोहित शर्माला दंड आकारल्यामुळे ‘या’ माजी क्रिकेटपटूला झाला आनंद

rohit sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जगात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाच्या आयपीएल हंगामांच्या नियमांत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला १२ लाख रुपयांचा दंड बसला होता. मुंबई संघाने एका सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला होता. … Read more

BREAKING : राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचे कोरोनामुळे निधन

Sanjay Devtale

नागपूर : संजय देवतळे यांचे निधन झाले आहे. देवाताळे यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने आज (25 एप्रिल) त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि चंद्रपूर जिल्ह्यात शोकाचे वातावरण आहे. संजय देवताळे हे गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात होते. ते चंद्रपूर … Read more

‘पैसे आणि ओळख या घटकांना कोरोना ओळखतच नाही’; फुलवा खामकरची फेसबुक पोस्ट व्हायरल

phulwa khamkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. हा कोरोना मागच्या वर्षीपासून आहे पण लोकांनी याचे गांभीर्य लक्षात घेतले नव्हते. आता तोच कोरोना आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला आहे. प्रत्येक घरातील कोणाला ना कोणाला कोरोनाची लागण होत आहे. आता तरी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात यावे म्हणून मराठी कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी एक … Read more

काय सांगता ! पोलीस स्टेशनमध्येच उरकला हळदीचा कार्यक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कोरोनामुळे अनेक लोकांच्या जीवनात बदल झाले आहेत. या कोरोनामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अशीच एक घटना राजस्थानच्या डुंगरपूर भागात घडली आहे. यामध्ये एका महिला कॉन्स्टेबलचा हळदीचा कार्यक्रम चक्क पोलीस स्टेशनमध्येच साजरा करण्यात आला. या महिला कॉन्स्टेबलचे नाव आशा रोत … Read more