कोरोना संकटात पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेत पुजाऱ्यांची एकचं झुंबड

पुरी । ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रा आज पार पडली. दरम्यान, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने भगवान जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रेला सशर्त परवानगी दिली होती. धार्मिक परंपरांमधल्या बारीक सारीक गोष्टीत न्यायालय लक्ष घालू शकत नाही, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तसेच मंदिर व्यवस्थापनाने विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, असे न्यायालयानं सशर्त परवानगी देताना म्हटले होते. मात्र, कोरोना संकटाच्या … Read more

कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

पॅनकार्डशी निगडीत ‘हे’ काम पुर्ण करण्याची अखेरची संधी; विसरलात तर होईल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या या साथीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे आपल्याला बरीच महत्वाची कामे पुढे ढकलावी लागली असेल. आता मात्र त्यांची अंतिम मुदत लक्षात ठेवून, आपल्याला सर्व आवश्यक कार्ये वेळेवर पूर्ण करावी लागतील, अन्यथा आपल्याला नुकसान सोसावे लागू शकते. यापैकी एक काम म्हणजे आपले पॅन कार्ड -आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत … Read more

कोरोना कृष्णकुंजच्या दारात; राज ठाकरेंच्या २ वाहन चालकांना कोरोनाची बाधा

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांच्या शासकीय सुरक्षारक्षकांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेजण उपचारानंतर कोरोनातून बरे झाले आहेत. राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे … Read more

राज्य शासनाने विविध विषयांच्या सर्व CET परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई । ‘सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या … Read more

देशात मागील २४ तासात ४४५ कोरोना बळींची नोंद; कोरोनाबाधितांची संख्या सव्वा ४ लाखांवर

नवी दिल्ली । देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या सव्वा ४ लाखांवर पोहचली आहे. देशात गेल्या 11 दिवसांपासून दररोज 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 14,821 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 445 जणांचा … Read more

खळबळजनक! सौरव गांगुलीच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण

कोलकाता । भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कुटुंबियांना झाली करोनाची बाधा झाल्याचे आता पुढे आले आहे. या सर्वांवर आता एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी एक चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर त्यांच्या उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुलीची पत्नी आणि तिच्या आई-बाबांना कोरोनाची लागण … Read more

राज्यात आतापर्यंत ७ लाखांहून अधिक कोरोना टेस्ट, रुग्ण बरे होण्याचा दर आहे इतका

मुंबई । राज्याचा कोरोनाविरुद्ध लढा सुरुच असून राज्यात आतापर्यंत ७ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे. तर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात शुक्रवारी १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या … Read more

दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट कायम असतांना एक चांगली बातमी हाती आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. राज्यातील रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. दरम्यान, राज्यात सध्या ५३ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरु … Read more

मागील २४ तासात १३ हजार ५८६ करोनाग्रस्त वाढले; एका दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या देशातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवत आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. गुरूवारी दिवसभरात १३ हजार ५८६ नवे रुग्ण आढळले. पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या एका दिवसात १३ हजारहून अधिक संख्या पाहायला मिळाली आहे. देशभरात एकूण रुग्णांची संख्या ३ … Read more