सुब्रमण्यम स्वामींचा उद्धव ठाकरेंना सल्ला, आघाडीतून बाहेर पडण्याची ‘हीच ती वेळ’ अन्यथा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाची महाराष्ट्रातील निवडणूक आणि विशेषतः निवडणूक निकालानंतरची मुख्यमंत्री पदाची निवड होईपर्यंतचा काळ चांगलाच गाजला आहे. अनेक चढ-उतारांनी या निवडणुकीने देशभरात चर्चेला कारण दिले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रोज नव्याने त्यांच्यावरच्या टीका आणि त्यांना दिले जाणारे सल्ले चर्चेत येत असतात. याच चर्चांमध्ये भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी एक नवा मुद्दा दिला … Read more

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करा! सुब्रमण्यम स्वामींचा फुकटचा सल्ला

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील कोरोनामुळे तयार झालेली सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे असमर्थ आहेत. अशावेळी राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

मुख्यमंत्री ठाकरेंची तरुण उद्योजकांना हाक; भाडेतत्वावर जमीन देणार

मुंबई । महाराष्ट्र करोना विरुद्ध लढा देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. आजही मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरुण उद्योजकांना हाक दिली आहे. तसेच यावेळी नवीन उद्योजकांना भाडेतत्वावर जमीन देण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली आहे. नवीन उद्योगांसाठी एकूण ४० हजार एकर … Read more

उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक जाऊन दाखल केला उमेदवारी अर्ज

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. 21 मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब जाऊन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी … Read more

विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच? काँग्रेसनं उतरवला पहिला उमेदवार मैदानात, २ जागांसाठी आग्रही

मुंबई । विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस दुसरा उमेदवार लवकरच जाहीर करेल, असं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. काँग्रेस २ जागांवर ठाम असल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असंच चित्र सध्या दिसत आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने ४ उमेदवार रिंगणात … Read more

‘त्या’ १६ मजुरांचा समावेश कोरोना बळींच्या यादीत करा; सामनातून शिवसेनेची मागणी

मुंबई । मालगाडीखाली चिरडून मरण पावलेल्या १६ स्थलांतरित मजुरांची नोंद करोना बळींमध्ये करायला हवी, अशी मागणी सामानाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केली आहे. ‘औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले १६ स्थलांतरित मजूर हे करोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत. त्यामुळं त्यांच्या मृत्यूची ‘अपघाती’ म्हणून नोंद न करता करोना बळींच्या यादीत त्यांचा समावेश व्हायला हवा,’ अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली … Read more

‘IFSC केंद्राबाबतचा तुमचा वकिली बाणा गेला खड्यात’; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ

मुंबई । मोदी सरकानं मुंबईत प्रस्तावित असलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या निर्णयावरून राज्यातील राजकारणही बरंच तापलं आहे. एकीकडे भाजपा IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णयाला काँग्रेसचं जबाबदार असल्याचं सांगत केंद्राचा बचाव करण्याचा प्रयन्त करत आहे. तर राज्यातील इतर नेते केंद्रानं मुंबईवर अन्याय केल्याची भावना … Read more

मोदीजी पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत- शिवसेना

मुंबई । मोदी यांनी पवारांना आपले गुरू म्हणून घोषित केलेच आहे व पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत हे दिसून आले आहे. सत्तेवर असणे वेगळे व राज्य चालविण्याचा अनुभव असणे वेगळे. त्यामुळे पवारांचा अनुभव याक्षणी महत्त्वाचा असून त्यांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे. कोरोनामुळे वाढलेला खर्च आणि लॉकडाउनमुळे … Read more

मोदींच्या मन कि बात नंतर मुख्यमंत्री ठाकरेंची दिल की बात! वाचा ठळक मुद्दे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अक्षयतृतीये निमित्त राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधला. ठाकरे यांचे कोरोनाच्या काळातील सर्वच संवाद अतीशय प्रभावी ठरताना दिसत आहेत. अतिशय साधेपणाने आणि कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता उद्धव ठाकरे जनतेशी संवाद जोडत असल्याने हा संवाद खर्या अर्थाने दिलसे असल्यासारखा वाटतो आहे. हल्ली सगळे दिवस सारखे झालेत. … Read more

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे आजी मुख्यमंत्री ठाकरेंना खास पत्र! केल्या ‘या’ विशेष सुचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा बघता लॉकडाऊन कधी संपेल किंवा किती वाढविला जायील याबद्दल सर्वच साशंक आहेत. अश्या परिस्थितीत राज्यातील काही महत्वाचे घटक आहेत कि ज्यांचा रोजी रोटीचा प्रश्न आहे. अश्यांना राज्य सरकारतर्फे काही मदत व्हावी तसेच कोरोनाच्या अनुषंगाने … Read more