कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची लस तयार होईल हा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

आयसीएमआर चे भार्गव यांनी १५ ऑगस्टपर्यंत कोवॅक्सीन सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व क्लिनिकल चाचण्यांसाठी १२ ट्रायल साईट्स वर पत्र लिहिल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता लवकरच कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र हा दावा अवास्तव आहे असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here