अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर कुठे बिघडलं – उदयनराजे भोसले

राजकीय कोलांटउड्या मारण्यात माहीर असलेले उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी पैसे लागतातच. आवश्यक तेवढा निधी सरकारकडे उपलब्ध नसेल, किंवा असलेला निधी दुसऱ्या कामांसाठी वापरला जात असेल तर लग्न-समारंभासाठी गडकिल्ले भाड्याने देण्यात काहीच चुकीचं नाही असं विधान उदयनराजे यांनी केलं आहे.

‘राहुल गांधींच्या सभा भाजपच्या जागा वाढवतात’, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना उपरोधिक टोला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना पाहून मला आनंद झाला. कारण राहुल गांधी जेव्हा प्रचार सभा घेतात. तेव्हा काँग्रेसच्या जागा कमी होतात. आणि भाजपच्या जागा वाढतात. असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वेचे भाजप सेना महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ – शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी; मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका

एकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली असून त्यांच्यासोबत आता कुणीच नाही असंही फडणवीस पुढे म्हणाले.

मैदानात पैलवान नाही म्हणता, मग मोदींना दिल्लीवरून कशाला बोलावता ; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

आम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी कुणी ऐकलं नाही आणि कुणी त्यांना पाहिलंही नव्हतं.

फसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात

सध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न याबाबत सरकार बोलणं टाळत असून घोषणांच्या जाहिरातबाजीत वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही खर्गे यांनी केली.

कुस्ती पैलवानांशी होते, ‘अशां’शी नाही; बार्शीच्या बालेकिल्ल्यातून पवारांचे फडणवीसांवर टीकास्त्र

अमित शाह कलम ३७० वर मला जवाब दो म्हणतायत, तर मी त्यांना ठासून सांगू इच्छितो, “आमचा कलम ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, तुम्ही ते कलम रद्द केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, मात्र भाजपने आता अनुच्छेद ३७१ बद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा असं भाजपला वाटत असेल तर ३७० आणि ३७१ वर भाजपा वेगळी भूमिका का घेत आहे?

मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरला लिंबू लावायला हवं, नेटकाऱ्यानी केलं ट्रोल

विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचारसभेसाठी फिरत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याची घटना पेणमध्ये घडली. या घटनेमुळे काही काळ गोंधळ उडाला. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या अधिकारी या अपघातातून सुखरुप बचावलेत.

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’आदेशाने राधाकृष्ण विखे पाटील कात्रीत

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आता शिर्डी मतदारसंघातूनच भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी, ‘भाचीला मोठ्या मताधिक्यान निवडून आणा’, असा सूचना वजा आदेश मुख्यमंत्र्यांनी विखे पाटलांना दिला.

राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.

ऐसा कैसा चलेगा रे राजू ? सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली; कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..!!

भाजपा समर्थकांनी हे फेसबुक पेज सुरु केले आहे. यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.