मंत्रिमंडळाची बैठक संपली : राज्यात अखेर संपूर्ण लॉकडाऊन लागणार, लवकरच घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपलीय. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितलंय. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून … Read more

अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नव्हे’, जितेंद्र आव्हाड यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली. तेव्हा तुम्ही कुठल्या पवित्र संबंधात जोडले गेले होता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला केला. जितेंद्र आव्हाड मंगळवारी (20 एप्रिल) … Read more

“….हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस”; आव्हाडांचा भाजपाला सणसणीत टोला

jitendra avhad devendra fadanvis

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  कोरोनाने राज्यात हाहाकार उडविलेला असताना शनिवारी रात्रीपासून राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या निमित्ताने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर, भाजपा नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे … Read more

महाराष्ट्राकडून भीक मागतो, ऑक्सिजन पुरवा’! जितेंद्र आव्हाडांची नरेंद्र मोदींना विनंती

jitendra awhad narendra modi

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेमडिसिविर आणि ऑक्सिजनची वारंवार मागणी राज्यातील नेत्यांकडून पंतप्रधान मोदींकडे केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींना पत्र लिहून ऑक्सिजनची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत भावनिक ट्विट करत पंतप्रधान यांच्याकडे राज्याला ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या … Read more

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!! कविता सादर करत आव्हाडांनी भाजपला लगावले टोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. दरम्यान विरोधी पक्ष भाजपने कोरोनासाठी मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला जबाबदार धरले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक कविता सादर करत भाजपला जोरदार टोले दिले आहेत. खरंच हा … Read more

राजकारण करून लोकांचे जीव घेण्यापेक्षा जीवदान देऊन पुण्य कमवा : जितेंद्र आव्हाड यांचा केंद्र सरकारवर निशाणा

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात करोनाची वाढती संख्या लक्षात घेता. कोरोनाची साखळी तोडणे महत्त्वाचे बनले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. अशातच कोरोनातून मार्ग म्हणजे लसीकरण हाच एक आशेचा किरण आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून लसींच्या कमतरतेमुळे राज्यात लसीकरण ठप्प झाले आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला … Read more

भाजप सोबत राहावे म्हणून ‘या’ आमदारावर रश्मी शुक्ला यांनी दबाव आणला; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

jitendra awhad rashmi shukla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड  गंभीर आरोप केला आहे. रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपसोबत राहण्यासाठी धमकावले होते, असे आव्हाड यांनी म्हटले. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी … Read more

‘अब की बार ट्रम्प सरकार’ बोंबलत होता? तेव्हा ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का?- आव्हाड

मुंबई । दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या पॉपस्टार रिहानाचं कौतुक करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते व भारतातील काही सेलिब्रिटींवर तोफ डागली आहे. नुकतंच अमिरिकेची पॉपस्टार रियाना हिनं याबद्दल एक ट्वीट केलं होतं. भाजपसह देशातील बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनीही विदेशींनी भारतात ढवळाढवळ करू नये, असं म्हणत रिहाना अप्रचार करत असल्याच्या सरकारच्या सुरत … Read more

Union Budget 2021 चा सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढलाय

Jitendra Awhad On Budget 2021

मुंबई | आज केद्रीय अर्थसंकल्प 2021 लोकसभेत सादर करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात LIC, IDBI सह अनेक सरकारी संस्थांचे खाजगीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. यावरुन आता केंद्र सरकारवर टिकेची झोड उठली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचा सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढलाय असं मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. “या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा सरळ आणि … Read more

Arnab Goswami Arrest : अन्वय नाईक यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणारचं – जितेंद्र आव्हाड

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला अटक केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. अर्णव गोस्वामीच्या अटकेवर विशेषकरून भाजप ठाकरे सरकारवर कडाडून टीका करताना दिसत आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अर्णवरील कारवाईचा राज्य सरकारशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे. अशातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून … Read more