कोल्हापुरात वैद्यकीय साहित्य खरेदीत बनवेगिरी  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी लागणारे संच प्रमाणित दर्जाचे न घेता भलतेच  घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रासह भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली … Read more

विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करणे पडले महागात 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करायचा, तो डंख मारू लागला की त्याला माणसांच्या गर्दीत सोडायचे आणि हे करतानाचे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे एका इसमाला महागात पडले आहे. या स्टंटचे बक्षीस म्हणून त्याला वन्य जीवाचा खेळ केल्याप्रकरणी वन्य कोठडी भोगावी लागणार आहे.  फेसबुकवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अल्ताफ कलावंत या संशयित … Read more

मुंबईला जाण्यासाठी पास लागत नाही, पैसे द्या बाकी आम्ही मॅनेज करतो म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात जिल्हा बंदी असताना समर्थ ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ऑनलाईन बुकींग करून जादा दराने विनापासचे प्रवाशी वाहतुक करणारी चारचाकी कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथील कोल्हापूर नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतली. यामध्ये ड्रायव्हर, एजंटसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनंता उर्फ निलेश अशोक माने (वय 36 वर्षे, रा. खराडे कॉलनी … Read more

जनतेने शांततेने आणि संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे -प्रा. डॉ. एन.डी.पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक महामारी असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी जनतेनं शांतता आणि संयम राखून, घरी राहून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन डी पाटील यांनी केले. प्रा. डॉ. एन डी पाटील प्रतिष्ठानतर्फे कोरोना नियंत्रणासाठी 60 हजार रुपयांचे मास्क आणि दोन लाख रुपयांची मदत कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंडासाठी … Read more

शिक्षा भोगत असलेल्यांचे हात बनवत आहे मास्क; कोल्हापूरच्या कळंबा कारागृहाची १५ लाखांची उलाढाल

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर देशभरात लॉकडाउन असतानाही कळंबा मध्यवर्ती कारागृहाने तब्बल 15 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कापडी मास्क, रुमाल आणि रुग्णालयांना लागणारे सुती कापड यांच्या माध्यमातून हा व्यवसाय केला आहे. कोल्हापूरसह सांगली , सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून आलेल्या मागणीची पूर्तता बंदीजणांनी केली आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन आहे. परिणामी अनेक व्यवसायांचे आर्थिक चक्र मंदावले … Read more

वसुंधरा दिनानिमित्त बायसन नेचर क्लबची राधानगरी अभयारण्यात पाणवठे स्वच्छता मोहिम

यावर्षी कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर प्राणी पक्षी मुक्त संचार करत असलेले राधानगरी परिसरात नित्याचे दिसत आहेत पण पाण्याअभावी त्यांचे हाल होत आहेत.

कोल्हापूरात अवकाळी पावसाने ऊसतोड कामगारांच्या झोपड्या उद्ध्वस्त; रात्र पावसात भिजत काढली

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना विषाणूमुळे सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊनचा सर्वधिक फटका ऊसतोड मजुरांना बसला आहे. अस्मानी आणि सुलतानी दोन्हीही संकटांचा सामना हे ऊसतोड मजूर करत आहेत. रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झालाय. या मुसळधार पावसामुळे शिरोळ मधील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोड कामगारांच्या 100 हून अधिक झोपड्या उध्वस्त झाल्या … Read more

कोल्हापूरात आणखी एक कोरोनाग्रस्त सापडला; संख्या ३ वर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरमध्ये आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३ वर गेली आहे. कसबा बावडा येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आज नवा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.कोरोना बाधित महिला ही कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील … Read more

द ग्रेट कोल्हापूरकर! सफाई कर्मचाऱ्याचे पैशाचा हार घालून स्वागत

कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर देशावर जीवघेण्या कोरोनाच संकट आहे. अशा नाजूक आणि धोकादायक परिस्तितीत सुद्धा डॉक्टर, पोलीस, इतकेच काय सफाई कर्मचारी जीव मुठीत धरून तुमच्या-आमच्यासाठी आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळं लोकडाऊनच्या काळात शहराची स्वछता आपल्या खांद्यावर घेणारे आरोग्य कर्मचारी खऱ्या अर्थाने हिरो ठरत आहेत. अशी कृतज्ञतेची भावना मनात बाळगून आज कोल्हापूरकरांनी कचरा उचलणाऱ्या कामगाराचा हार … Read more

कोल्हापूरात २ करोना संशयित रुग्णांचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक करोना पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शहरातील २ करोना संशयित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाल्याने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. मृतांपैकी एक ३७ वर्षीय तरुण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष करोना कक्षात भरती होता. तर … Read more