युपीए अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलविली विरोधी पक्षांची बैठक; उद्धव ठाकरे, शरद पवार राहणार उपस्थित

नवी दिल्ली । संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कष्टकरी वर्ग, कामगारांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी  २२ मे रोजी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार तर शिवसेनेकडून … Read more

सोनिया गांधीनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केल्या ‘या’ सूचना

नवी दिल्ली । भारत सध्या कोरोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे देश आर्थिक संकटाला सामोरा जातो आहे. अशात लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळाली पाहिजे यासाठी सूचना करणारं पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला (MSME) लॉकडाउनचा फटका बसतो आहे. लॉकडाउनमुळे लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला … Read more

सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अर्णब गोस्वामीला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

नवी दिल्ली । सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना पुढील ३ आठवडे अटकेपासून संरक्षण दिलं आहे. गोस्वामी यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. अर्णब गोस्वामी यांच्यावरील सर्व एफआयआर एकत्र करण्यात याव्यात, देशभरात ज्या … Read more

गरिबांच्या खात्यात 7 हजार 500 रुपये जमा करा; काँग्रेसची मोदी सरकारला मागणी

नवी दिल्ली । देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारकडे करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम किसान खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी अशी मागणीही काँग्रेसने … Read more

सोनिया गांधींचे मोदींना भावनिक पत्र; म्हणाल्या हातावर पोट असलेल्यांची काळजी घ्या

वृत्तसंस्था । देशात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व छोटे-मोठे उद्योग बंद आहते. याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम हातावरचं पोट असलेल्या सगळ्यांवर होत आहे. रोज कमावून खाणाऱ्या अशा लोकांना आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सतावत आहे. तेव्हा लॉकडाऊनच्या कालावधीत अशा सगळ्या लोकांची काळजी घ्या, या आशयाचं पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया … Read more

कोरोनाच्या संकटात सोनिया गांधींनी पत्रातून केल्या मोदींना ‘या’ ५ सूचना

नवी दिल्ली । देशभरात करोनाचे ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. देश एका मोठ्या महामारीचा सामना करतो आहे. अशा परिस्थितीत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोनाशी लढण्यासाठी आपण निधी कसा वाचवू शकतो याबाबत ५ महत्वाच्या सूचना केल्या आहेत. करोनामुळं देशावर आर्थिक संकट तयार झालं असून मोदी सरकारने करोनाशी लढण्यासाठी आणखी कठोर निर्णय … Read more

कोरोनाच्या संकटात मोदींनी माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधानांसोबत साधला संवाद

नवी दिल्ली। देशावर कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एच.डी देवगौडा यांच्याशी फोनवर संवाद साधला. तसेच पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बरोबर विरोधी पक्षातील इतर नेत्यांशी सुद्धा फोनवर संवाद साधला. देशावर कोरोनाचं सावट आणखी दाट होत आहे. देशातील सर्व व्यवहार बंद … Read more

सहा महिने सर्व प्रकारची कर्ज वसुली बंद करा; सोनियांचे मोदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. सोनियांनी आपल्या पत्रात पुढील ६ महिने सर्व प्रकराची कर्ज वसुली थांबवण्याची मागणी केली आहे. सोनियांनी आपल्या चार पानांच्या पत्रातून पंतप्रधान मोदींना वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची मागणी म्हणजे पुढील ६ महिन्यासाठी पीक कर्ज वसुली थांबवावी. … Read more

काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्ली हिंसाग्रस्त भागांचा दौरा करणार; सोनिया गांधींकडे सादर करणार अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील हिंसाचाराबद्दल माहिती गोळा करण्यासाठी व अहवाल देण्यासाठी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक टीम तयार केली आहे. या पाच सदस्यीय प्रतिनिधीमंडळाला ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागाचा दौरा करून सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सोनिया यांनी मुकुल वासनिक, शक्तीसिंग गोहिल, कुमारी सेलजा, तारिक … Read more

दिल्लीतील हिंसाचार सोनिया गांधी यांच्या चिथावणीखोर वक्तव्याने- प्रकाश जावडेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्ली हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप केला. दिल्लीतील घडलेला हिंसाचार हा केवळ २ दिवसांचा नसून गेल्या २ महिन्यांपासून लोकांना भडकवण्याचा प्रयन्त केला जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना सोनिया गांधी यांनी २ महिन्यांपूर्वी रामलीला मैदानात केलेल्या भाषणात आर-पारची … Read more