‘या’ टिक टॉक स्टारने एकतर्फी प्रेमातून केली तरुणीची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुचर्चित नैना खून प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी मोठे यश संपादन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी शेर खान याला बक्षिसाच्या २० हजार रुपयांसह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेर उर्फ ​​शाहरुखचे नयनावर एकतर्फी प्रेम होते. १७ जून रोजी आपल्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने आरोपीने नैनाला चाकूने वार करून ठार मारले. … Read more

मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरीयाणातील भाजपाच्या नेत्या सोनाली फोगट यांना बाजार समितीच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी सोनाली फोगट यांना हिसार न्यायालयात हजर केले. न्यायालयाने यावेळी त्यांची जामीनावर सुटका केली. हरीयाणातील भाजपाच्या नेत्या सोनाली फोगाट यांना बुधवारी हिसार पोलिसांनी अटक केली. हिसारमधील बालासमंद येथील बाजार समितीच्या सचिवाला मारहाण … Read more

TikTok कंपनीने भारतातील ‘हे’ दोन व्हिडिओ अ‍ॅप केले बंद; जाणुन घ्या संपुर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्स आता भारतामध्ये आपले दोन लोकप्रिय व्हिडिओ अ‍ॅप्स बंद करणार आहेत. बाईटडन्सने विगो व्हिडिओ आणि व्हिगो लाइट हे अ‍ॅप्स लवकरच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी, कंपनीने व्हिगो व्हिडिओच्या साइटवर एक पोस्ट टाकून यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटी हे दोन्ही अ‍ॅप्स बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या … Read more

टिक-टॉक हा एक चायनीज व्हायरस; शक्तिमान फेम मुकेश खन्नांनी पोस्ट केला इंस्टाग्राम व्हिडिओ

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर टिक-टॉकर्स विरुद्ध युट्यूबर्स यांचे युद्ध रंगले आहे. यात आता शक्तिमान या लोकप्रिय मालिकेत पहिल्या भारतीय सुपर होरोची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्ले स्टोअरवर टिक-टॉकचे रेटिंगही कमी झालं ही इतक्या वाईट बातम्यांमध्ये एक चांगली बातमी समोर आली असून एका चायनीज व्हायरस आपल्यापासून दूर … Read more

आईला भेटण्यासाठी १४०० किमी ड्राइव्ह करत मुंबईहून दिल्लीला पोहोचली ‘हि’ बॉलिवूड अभिनेत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे देशात बर्‍याच दिवसांपासून लॉकडाउन सुरु आहे. अशा परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे हे एका आव्हानापेक्षा काही कमी नाही. पण हे असे असूनही अभिनेत्री स्वरा भास्करने या सुरु असलेल्या लॉकडाउन दरम्यान १४०० किमीचे अंतर कापले आहे, तेही रस्त्याने. या अभिनेत्रीने नुकताच मुंबई ते दिल्ली हा प्रवास केला आहे. स्वराने … Read more

पती करत होता टिकटॉक बनवण्याचा हट्ट; पत्नीने मुलासोबत केली आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. येथे सोशल मीडिया अ‍ॅ प टिकटॅकमुळे एका कुटुंबातील दोन व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. आई आणि मुलगा अशा या दोन मरण पावलेलय व्यक्ती आहेत. करीमा (वय ३५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे तर तिचा मुलगा हा अल्पवयीन होता. सोमवारी रात्री … Read more

TikTok vs YouTube | टिकटाॅक चे रेटिंग ४.७ वरुन थेट २ वर कसे घसरले? जाणुन घ्या संपुर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्विटरवर गेल्या अनेक दिवसांपासून युट्यूब आणि टिकटाॅकच्या चाहत्यांमध्ये एक नवीन प्रकारचे युद्ध सुरू झाले आहे. युट्यूब आणि टिकटॉकवर भारी कोण आहे याबद्दल हे वाकयुद्ध सुरु आहे ? एक बाब हि आहे की गूगल प्ले स्टोअरवर टिकटॉकचे रेटिंग सध्या ४.७ वरून २ वर आले आहे. तसेच,काही युझर्सनी गूगल प्ले स्टोअरवर या टिकटाॅकला … Read more

अनोळखी पुरुषासोबतचा ‘असा’ व्हिडीओ व्हायरल झाला म्हणून पाकिस्तानात दोन तरुणींची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच्या कुटुंबानेच ही हत्या केली आहे. व्हिडिओमध्ये या मुली एका पुरुषासह दिसल्या होत्या. या मुलींपैकी एक १६ वर्षांची आणि दुसरी मुलगी ही १८ वर्षांची होती. काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तानमध्ये व्हायरल झाला होता, ज्यामध्ये या मुली एका … Read more

इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनने केला तमिळ गाण्यावर डान्स;ए.आर.रेहमान यांनी शेअर केला तो मजेदार व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान क्रिकेटचे सर्व कार्यक्रम थांबले असून, यामध्ये खेळाडूंसह कोमेंटरी करणारेही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. कधी खेळाडू त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत चॅट करताना दिसतात तर कधी त्याच्या आयपीएल मधील संघासमवेत.यावेळी खेळाडू त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी आणि त्याच्याशी संबंधित काही मजेदार किस्से सांगताना दिसतात. पण आजकाल टिकटॉक वरही खेळाडू बरेच अ‍ॅक्टिव … Read more

टिकटॉकवरुन भिडे गुरुजींचा आक्षेपार्ह व्हिडीओ, अश्र्लील चित्रफीत व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात टिकटॉक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्यासह कारकर्त्यांनी दिले आहे. जर या विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर कठोर कायदेशीर … Read more