‘निसर्गग्रस्त’ रायगड जिल्ह्याला तातडीची १०० कोटींची मदत- मुख्यमंत्री ठाकरे

रायगड । निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. या चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेले पाहता रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारने तातडीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अलिबागमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केल्यानंतर तातडीच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. यावेळी वादळामुळे इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीनुसार मदत जाहीर करणार असंही त्यांनी … Read more

निलेश राणेंकडून अजित पवारांची स्तुती; परिस्थिती आणि प्रशासन हाताळण्याच्या कौशल्याचे केले कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ येऊन गेले. यामुळे कोकण परिसरातील किनारपट्टी भागातीप गावांचव मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे पुणे जिल्ह्याच्याही काही भागांमध्ये नुकसान झाले आहे. या नुकसानीची उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी बोलून माहिती घेतली. तसेच याचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी … Read more

निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री ठाकरे ऑन फिल्ड; मोठी घोषणा करण्याची शक्यता

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारीपट्टयाला मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंबंधी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा आढावा घेतला होता. त्यानंतर आता ठाकरे थेट फिल्डवर उतरले असून आज ते रायगड जिल्ह्याची पाहणी करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे एखादी मोठी घोषणा करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. निसर्ग वादळाने रायगड जिल्हा हादरून गेला … Read more

मुंबईवरील ‘निसर्गा’चे संकट टळल्यावर मुख्यमंत्री ठाकरे हवामान खात्याला म्हणाले..

मुंबई । महाराष्ट्रावरील ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट टळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या वाटचालीविषयी अचूक अंदाज दिल्यानं उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनी करुन त्यांचे अभिनंदन केले. हवामान खात्याने योग्य अंदाज वर्तवल्याने राज्य सरकारला चांगली तयारी करता आली, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. … Read more

वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही … Read more

जवळपास अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोना मुक्त झाला – संजय राऊत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  गेले अनेक दिवस देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्या, कोरोनामुळे होणारे मृत्यू, कोरोना उपचार, कोरोनासंबंधी राजकीय लोकांचे आरोप-प्रत्यारोप, कोरोना बचावासाठीचे उपाय, दक्षता असे अनेक विषय माध्यमांमधून झळकत आहेत. टीव्ही लावला असता टीव्ही वर सतत कोरोनाचे अपडेट्स दिले जात आहेत. आज मात्र या बातम्यांची जागा ‘निसर्ग’ चक्रीवादळाने घेतली आहे. सकाळपासून टीव्हीवर … Read more

आम्ही ठाकरे सरकारच्या सोबत; अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यात आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्र गेल्या २ दिवसांपासून निसर्ग चक्रीवादळाच्या भीतीच्या छायेखाली आहे. आता हे वादळ महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकत आहे. महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे नुकसान होते आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा हवाई वाहतुकीला फटका! मुंबई विमानतळ बंद

मुंबई । मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या निसर्ग वादळामुळं मुंबई आणि परिसरात सोसाट्याचे वारे आणि विमान घसरल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या निसर्ग वादळामुळं अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. याच सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मुंबई विमानतळावर आज उतरलेले फेडेक्स … Read more

येत्या 6 तासांनंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार भारतीय हवामान विभागाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निसर्ग चक्रीवादळ आज महाराष्ट्रात धडकल आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान ही झाले आहे. काही वादळ अजूनही समुद्रावरच आहे. हे पूर्ण वादळ जमीनीवर दाखल होण्यासाठी अजून एक तासाचा वेळ लागेल. सध्या मध्यभागी या वादळाची तीव्रता ९०-१०० किलोमीटर प्रती तास ते ११० किलोमीटर प्रती … Read more

रायगडमधील दिवेआगार, श्रीवर्धन किनाऱ्यावर ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकलं

रायगड । ‘निसर्ग’ चक्रीवादळ अखेर अलिबागच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगार येथील किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकलं. या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू परिघ ६० किलोमीटर असल्याची माहिती त्यांनी दिली. हे वादळ किनाऱ्यावर धडकत असतेवेळी लँडफॉल अर्थात वाऱ्याचा वेग हा प्रतितास १०० किलोमीटर इतका होता. सध्याच्या घडीला वादळाचा … Read more