होय! देशात कोरोनाचा समूह संसर्ग झालाय, केंद्र सरकारने हे सत्य स्वीकारलं पाहिजे- तज्ज्ञ

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे, ही बाब आता केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे. ही गोष्ट नाकारण्यात अर्थ उरलेला नाही, असे मत ‘एम्स’चे माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा यांनी व्यक्त केले. ‘आऊटलूक’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकारनं पुढे येऊन समूह संसर्ग झाल्याचं मान्य करण्याची वेळ आली आहे. … Read more

कोरोना टेस्ट झाली आणखी स्वस्त; ठाकरे सरकारनं केली ५० टक्के दर कपात

मुंबई । खासगी लॅबमध्ये होणाऱ्या कोविड चाचणीच्या दरात तब्बल ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारनं घेतला आहे. कोविड रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. आयसीएमआरनं निश्चित केलेले कोरोना चाचणीचे ४ हजार ५०० रुपये हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार ठाकरे सरकारनं चाचण्यांच्या दरात थेट ५० टक्क्यांनी … Read more

आता कोरोना चाचणी २ हजार ८०० रुपयांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. खाजगी प्रयोगशाळेत आकारले जाणारे हे दर कमी करण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांच्या अहवालात आता हे दर २२०० व २८०० रु करण्यास सांगितले असून हे दर निश्चित केले आहेत. ४५०० रु ही  रक्कम  गरीब रुग्णांना परवडू शकणारी नसल्याने हे दर … Read more

भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं सर्वात स्वस्तातलं कोरोना टेस्टिंग किट; एका दिवसात २० हजार टेस्ट शक्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साइंटिस्ट काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च अंतर्गत वैज्ञानिकांसाठी सेंटर फॉर साइंटिस्ट्स ने कोविड -१९ साठी “नवीन कमी किमतीची आणि कमी तंत्रज्ञानाची आवश्यकता असलेली चाचणी विकसित केली आहे.” मात्र , ही नवीन चाचणीसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे कडून (आयसीएमआर) मान्यता मिळण्याची वाट पाहत आहे. एकदा मान्यता मिळाल्यानंतर ते दररोज २०,००० – … Read more

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, पण केंद्रानं समूह संसर्गाची शक्यता नाकारली

नवी दिल्ली । मागील काही दिवसांपासून देशात विशेषकरून मुंबई आणि दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने समूह संसर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान, केंद्र सरकारने देशात कोरोना समूह संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचे सांगितलं आहे. ‘भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात समूह संसर्ग झालेला नाही,’ अशी माहिती … Read more

चिंताजनक! देशात मागील २४ तासात ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशची वाटचाल लॉकडाऊनकडून अनलॉक होण्याच्या दिशेने होत असताना कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील 24 तासांत 9987 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 331 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 598 वर पोहोचली आहे. तर दिलासा देणारी एकमेव बाब … Read more

..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत; आव्हाडांची भाजपवर टीका

मुंबई । कोरोनाच्या संकटाच्या आडून काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत, असा थेट आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीबाबत आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट … Read more

कोरोनावर मात करण्यासाठी पतंजलीही मैदानात; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव यांचे पतंजली उत्पादन भारतभरात प्रसिद्ध आहे. विविध आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांचे अनेक उपाय प्रसिद्ध आहेत. ते सतत विविध कार्यक्रमातून, शिबिरातून योगमहत्व सांगत असतात. कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरु असताना रामदेव बाबा हे विविध वाहिन्यांवर लोकांना संचारबंदीचा सदुपयोग करीत योगाभ्यास करा, नियमित योग करा असा संदेश देताना दिसत आहेत. रोगप्रतिकारकशक्ती उत्तम … Read more

भारत सरकारचा मोठा निर्णय! बोगस चिनी टेस्ट किट्सची ऑर्डर रद्द

नवी दिल्ली । चीनला देण्यात आलेली कोविड-१९ रॅपिड अ‍ॅंटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठ्याची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. कोरोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करुन निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सच्या खराब दर्जामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरेदीच्यावेळी सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले … Read more

टेस्टिंग किट विक्रीतून नफेखोरी करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करा- राहुल गांधी

नवी दिल्ली । ”संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना काही लोक मात्र नफेखोरी करण्यास चुकत नाही आहेत. अशा भ्रष्ट मानसिकतेची लाज वाटते, घृणा निर्माण होते, अशा तीव्र भावना व्यक्त करताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत देशातील नफेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केंद्राला केली आहे. अशा नफेखोरांना देश कधीही माफ करणार नाही, असेही राहुल … Read more