चंद्रकांतदादांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! रोहित पवारांनी काढला चिमटा

पुणे । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यानंतर महाविकास विरूद्ध भाजपा यांच्यात कलगीतुरा बघायला मिळतो. काल मंगळवारी अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यास तयार असल्याचं विधान केलं होतं. या विधानावरून कर्जत जामखेड मतदारसंघाचे … Read more

“महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही”- शरद पवार

मुंबई  । “महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केलं. . ‘सीएनएन न्यूज १८’ वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. “महाविकास आघाडीतील सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहिल्यानंतर या सरकारचं नेतृत्व … Read more

चंद्रकांतदादा मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे राणेंना विचारा; शिवसेना नेत्याची टीका

कोल्हापूर । मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा कसा शेवट होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असा इशारा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिला. ते सोमवारी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. क्षीरसागर म्हणाले कि, … Read more

‘सरकारला फडणवीस संताजी-धनाजीसारखे दिसतात’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत. ज्याप्रमाणे संताजी-धनाजी सारखे पाण्यात … Read more

एकमेकांची थोडी काळजी घेतल्यास महाविकासआघाडी भक्कम होईल- बाळासाहेब थोरात

मुंबई । राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नाराजीमुळे महाविकासआघाडीत नाराजीनाट्य अजूनही सुरुच असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीत नाराजी असल्याचे वृत्त फेटाळून लावले. महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. आम्ही थोडी काळजी घेतली तर महाविकासआघाडी अधिक भक्कम होईल. सर्व … Read more

”मी इथेच बसलोय, सरकार पाडून तर दाखवा”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हान केलं आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु … Read more

भाजपचे बरेच आमदार आमच्या संपर्कात, नावं कळली तर राज्यात भूकंप होईल- यशोमती ठाकूर

अमरावती । भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल असा गौप्यस्फोट राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थिर असून उलट भाजपचेचं आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत, तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय- शरद पवार

पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता, नाराजी वगैरे काहीही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे’, असे नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले. शरद पवार यांची आज पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी … Read more

महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोधचं काय पण आंतरपाटही नाहीये; राऊतांचे फडणवीसांना उत्तर

मुंबई । भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधानेच पडणार असल्याचं विधान केलं होतं त्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं. महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोधचं काय पण आंतरपाटही नाहीये, हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल असा विश्वास संजय राऊत यांनी आज बोलून दखवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद … Read more