प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा मुलानेच केला निर्घुण खून

पुणे | प्रेमात पडलेल्या लोकांना कुणाचाही अडसर नको असतो. त्यांना अडचण निर्माण केला तर जन्मोजन्मीची नाती त्या प्रेमाच्या नात्यासाठी तुटली जातात. बऱ्याच वेळा खूनही झालेले बघायला मिळतात. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. आपल्या प्रेमाला अडसर ठरत असल्यामुळे, मुलाने प्रेमिकेच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईचाच खून केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यामधील खुर्द … Read more

अजित पवारांनी अर्थसंकल्पातून पुण्याला काय काय दिले? जाणुन घ्या

Ajit Pawar Pune

पुणे | राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असून त्यांनी पुणेकरांना खूष केल्याचे दिसत आहे. पुणे साठी अनेक मोठ्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. पुण्यात आणखी एक विमानतळ पुणे … Read more

पुण्याची वाहतुक समस्या सोडवण्याकरता रिंग रोड होणार; अजित पवारांची घोषणा

Ajit pawar

मुंबई | पुणे शहरातीप वाहतुक समस्या सोडवण्यासाठी शहराच्या बाहेरुन रिंग रोड बनवण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यावेळी पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आमच्या कुटुंबाची बदनामी थांबवा अन्यथा मलाही आत्महत्या करावी लागेल; पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर दिवसेंदिवस नवीन – नवीन माहिती समोर येतेय. यावर पूजाची बहिण दिया चव्हाण हिने संताप व्यक्त केलाय. पूजा आणि आमच्या परिवाराची बदनामी थांबवा अशी तिने हात जोडून माध्यमांना विनंती केली आहे. तसेच या … Read more

सॉफ्टवेअर कंपनीत केली तब्बल 70 लाखांची चोरी! 24 तासांच्या आत पोलिसांनी केले जेरबंद!

पुणे | पुण्यातील कल्याणीनगर येथील आयटी पार्क परिसरातून एका सॉफ्टवेअर कंपनीतील तब्बल 70 लाखांचे समान चोरीला गेले होते. यामध्ये नेटवर्क साहित्याचा समावेश होता. ही चोरी करणाऱ्या चोरट्याला येरवडा पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 52 लाख 50 हजार किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण … Read more

क्रिकेट खेळताना बॅट्समनचा मृत्यू; स्पर्धा सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका

पुणे | जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हृदयविकाराचा झटका येऊन मैदानावर मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून क्रिडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे घडली आहे. या खेळाडूचा मृत्यू झाल्याची पूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. … Read more

पुण्यामध्ये 5600 स्वस्त घरांसाठी निघाली लॉटरी, तुम्हीसुद्धा अर्ज केला असेल तर तुमचे नाव ‘या’ द्वारे चेक करा

नवी दिल्ली । महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) 22 जानेवारी 2021 रोजी पुणे विभागातील 5579 फ्लॅट्स आणि 68 भूखंडांसाठी लॉटरी सोडत काढण्यास सुरुवात केली आहे. ज्या अर्जदारांनी या योजनेंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे नाव या सोडतीत आले असेल तर ती माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. कोविड १९ नंतरही जवळपास 53,000 अर्ज आले … Read more

एकट्याने थाळी संपवा आणि 2 लाखांची नवी कोरी बुलेट सोबत घेऊन जा…

पुणे | आपल्या हॉटेलचे जेवण आणि नाव चर्चेत यावे म्हणून काही लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या लावत असतात. अशीच एक क्लृप्ती पुण्यातील शिवराज हॉटेल यांनी सुद्धा वापरली आहे. एखाद्या ग्राहकाने जर एका तासात बुलेट थाळी संपवली तर शिवराज हॉटेल त्या ग्राहकाला क्लासिक 350 या प्रकारातील बुलेट ही गाडी अगदी मोफत देणार आहेत. कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक हॉटेल … Read more

सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह कुटुंबियांना ‘स्वरगंधा सांगितिक कुटुंब पुरस्कार’ जाहीर

पुणे | गानवर्धन संस्थेतर्फे शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह त्यांच्या कलाकार कुटुंबियांना कै. स्वरगंधा टिळक स्मृती सांगितिक कुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी, संध्याकाळी 5.00 वाजता, टिळक स्मारक मंदिर सभागृहात सिम्बाॅयोसीस शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रमुख पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते … Read more

पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात

पुणे | पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्रात आयोजित या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, … Read more