चीनची राजधानी बिजिंगमध्ये पुन्हा संपुर्ण लाॅकडाउन जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात कोरोनाने थोडासा ब्रेक घेतला असावा असे वाटत असतानाच पुन्हा एकदा नव्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.  कोरोना साथीची सुरुवात जिथे झाली असे मानले जाते त्या चीनमध्ये संक्रमण आटोक्यात आल्याची चर्चा होती. पण पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चीनची राजधानी बीजिंग मध्ये २ … Read more

शाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar

पुणे । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

शाळा, महाविद्यालयं सुरु झाल्यास कसं असणार त्यांचं कामकाज? घ्या जाणून..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटकाळात शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने बैठका घेतल्या होत्या त्याचप्रमाणे या आपत्कालीन परिस्थितीत शैक्षणिक सत्राबाबत शासनाने राज्य शिक्षक परिषदेकडे काही सूचना मागितल्या होत्या. त्यानुसार परिषदेने नियोजन प्रारूप आराखडा सादर केला आहे. अशी माहिती या परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे व उपाध्यक्ष मोहन ओमासे यांनी दिली आहे. हे प्रारूप तयार करण्यासाठी … Read more

येणाऱ्या काळात आॅनलाइन शिक्षण पद्धती स्विकारावी लागेल – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना अजून किती दिवस असणार याबाबत निश्‍चित कोणालाच सांगता येत नाही. शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याची जाणीव सरकारला आहे. यामुळे येणार्‍या काळात ऑनलाईन शिक्षण पध्दती स्विकारावी लागेल असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून मोबाईल, कॉम्पयुटरद्वारे शिक्षण घ्यावं लागेल … Read more

कराड पंचायत समिती शिक्षण विभागाचे कोरोनाला आवतण, शिक्षण महोत्सवाचे आयोजन करुन शाळाकरी विद्यार्थ्यांना वेठीस धरणेचा प्रकार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले असल्याने राज्य शासनाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम टाळा असे आवाहन केले असताना अनेक संस्थांनी महिला दिनासह अनेक कार्यक्रम रद्द करत ते पुढे ढकलले मात्र कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाला कोलदांडा दाखवत कराड शिक्षण महोत्सव 2020 जोरदार साजरा केला जात आहे. … Read more

शासन निर्णयामुळं औरंगाबाद जिल्ह्यातील ३० शाळा कायमस्वरूपी होणार बंद! तर राज्यातील ९१७

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३० शाळा बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांनी दिली आहे. राज्यभरातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ९१७ शाळा बंद करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा शासन निर्णयामुळे … Read more

हेच कर्मवीर अण्णांचे स्वप्न, रयत शिक्षण संस्थेत राज्याबाहेरील मुलेदेखील – शरद पवार

नाशिक प्रतिनिधी | आज रयत शिक्षण संस्थेत राज्यातीलच नाही तर राज्याबाहेरील मुलेदेखील शिक्षण घेत आहेत. यातून समाजात ही पिढी आत्मविश्वासाने उभी राहते आहे. हेच कर्मवीर अण्णांचे स्वप्न होते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेविषयी गौरवद्गार काढले. संस्थेच्या विंचुर,ता. निफाड,जि. नाशिक येथील नूतन शालेय इमारतीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. … Read more

NTS परिक्षेत यशवंत हायस्कुलचे यश

कराड प्रतिनिधी | नॅशनल टेलेंट सर्च परिक्षेत यशवंत हायस्कुल, कराड येथील ऋषीकेश गंबरे या विद्यार्थ्याने यश संपादन केले आहे. देश पातळीवर आयोजित करण्यात येणार्‍या नॅशनल टेलेंट सर्च परिक्षेत गंबरे यांने यश संपादन केल्याने त्याचे कौतुक होत आहे. एन.टी.एस. परिक्षा उत्तीर्ण होऊन गंबरे हे शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. गंबरे यांचा 118 स्कोर झाला असून ओबीसी गटातून … Read more

अनेक शाळांनी HIV बाधित मुलांना प्रवेश नाकारले : गिरीश कुलकर्णी

पुणे प्रतिनिधी | समाजातील HIV बाधित मुलांना मुख्य प्रवाहातील अनेक शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याचं मत स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात ओवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनच्या (VOPA) वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बुलढण्याचे गटविकास अधिकारी शिव बारसाकले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चव्हाण हेही उपस्थित होते. गिरीश कुलकर्णी म्हणाले, “आम्ही HIV बाधित … Read more

त्या १,૪०૪ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – उच्च न्यायालय

thumbnail 1525087612005

औरंगाबाद : बोगस पटसंख्या दाखवणार्या १,૪०૪ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. २०११ साली महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने राज्यभरातील शांळांची पटपडताळणी कली होती. या पाहणीमधे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवली असल्याचे समोर आले होते. बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचे प्रकार अनेक शाळांमधे सर्रास सुरु असल्याचे पाहणीत … Read more