देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 96 हजार पार; तर आतापर्यंत 3029 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला तरीही कोरोना बाधितांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे. देशव्यापी ५५ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीत मात्र कोरोना संक्रमणाचा वेग वाढलेला दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ५,२४२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले तर १५७ मृत्यू झालेत. चिंता वाढवणारी बाब म्हणजे भारतात … Read more

कोविड-१९ च्या महामारीच्या दरम्यान सुरू झाली जर्मन फुटबॉल लीग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू या साथीच्या पार्श्वभूमीवर,कालपासून जर्मन फुटबॉल लीगची सुरुवात झाली. यामध्ये खेळविण्यात आलेली लढत हि जर्मनीच्या रिकाम्या स्टेडियममध्ये झाली. जेव्हा ही लीग सुरू झाली तेव्हा स्टेडियममध्ये पूर्णपणे वेगळेच दृश्य पहायला मिळाले. कोरोना साथीच्या आजारामुळे जगभरातील सर्व खेळ स्थगित करण्यात आलेले आहेत. परंतु खेळ पुन्हा सुरु करण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू होती. मात्र … Read more

वेश्याव्यवसाय बंद ठेवले तर भारतात कोरोनाचा प्रसार रोखता येईल – रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे नियंत्रणात ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी भारत सरकारला रेड लाईट परिसर बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या एका अहवालात असे म्हटले आहे की जर लस तयार होईपर्यंत भारताने आपली रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवली तर कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकेल तसेच नवीन संसर्गाची संख्या ही ७२ टक्क्यांनी कमी होऊ शकेल. … Read more

कोरोनामुळे बळी गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना मिळणार नोकरी

मुंबई । मुंबईतील बेस्ट परिवहन प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्टकडून नोकरी देण्यात येणार आहे. बेस्टमध्ये कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असूनही बेस्ट कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा किंवा मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत किंवा विमा दिला जात नाही. यासाठी बेस्ट संयुक्त कृती समितीनं सोमवारपासून बेस्ट कामगारांना कामावर न येण्याचे आवाहन … Read more

आत्मनिर्भर म्हणजे भारताचं स्वतःचं सक्षमीकरण, दुसऱ्यांवर बहिष्कार नव्हे – निर्मला सीतारमन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आत्मनिर्भर भारताचा अर्थ इतरांना कमी लेखणे असा नसून स्वतःच अधिक सक्षम होण्याचा आहे. भारत स्वतःच्या कृतीने स्वतःच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम होईल अशा अर्थाचा विचार नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचं २० लाख कोटी रुपयांच्या चौथ्या पत्रकार परिषदेतील विश्लेषणात निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. #WATCH LIVE: Finance Minister Nirmala Sitharaman addresses a press conference. … Read more

वानखेडेच्या पिचवर आता कोरोनाचा सामना; स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट कायम आहे. जून महिन्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार येणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात ५० माकडांचा रहस्यमयरीत्या मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संकटात वाढ होत असतानाच कर्नाटकातील एका जिल्ह्यात जवळपास ५० माकडे मृतावस्थेत आढळून आली आहेत. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्या माकडांवर विषप्रयोग करण्यात आला असावा अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. हे कोणत्या कारणास्तव केले गेले, याबद्दल सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माकडांच्या या … Read more

अमेरिका चीनसोबतचे सर्व व्यापारी संबंध थांबवणार; ट्रम्प म्हणतात जिनपिंग यांच्याशी बोलायचीही इच्छा नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी चीनवर पुन्हा एकदा आगपाखड करताना म्हंटले की,’अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी यापुढे बोलण्याची आपली इच्छा नाही. कोरोनो व्हायरसच्या साथीशी चीनचा संबंध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अमेरिकेच्या दृष्टिकोनातून असे दिसते की ते चीनशी असलेले आपले व्यावसायिक संबंध पूर्णपणे संपवण्याच्या मार्गावर आहेत. कोरोना साथीच्या विषयावरून वॉशिंग्टन आणि … Read more

ट्रम्प यांच्या ‘त्या’ आरोपामुळे भर बैठकीतच दिला जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांनी राजीनामा

वृत्तसंस्था । जगभर पसरलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं चीन, जागतिक आरोग्य संघटना यांच्यावर आरोप करत आहे. ट्रम्प यांनी जागतिक व्यापार संघटनेलाही या वादात ओढलं असून, संघटनेचे महासंचालक रॉबर्टो अझेवेडो यांनी व्हिडीओ कान्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या बैठकीत अचानक आपला राजीनामा दिला. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक व्यापार संघटेनेच्या विभागाप्रमुखांच्या शिष्टमंडळाची गुरूवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे … Read more

पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यात ‘कोरोना पे चर्चा’

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांनी कोरोना साथीच्या जागतिक परिणाम या विषयावर पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास देवाणघेवाण केली. वैज्ञानिक … Read more