पीपीई किट घातलेल्या नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

वडोदरा । कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये पीपीई किट घातलेल्या एका नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. वडोदरातील गोत्री परिसरातील वैकुंठ सोसायटीजवळ तिचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता खळबळजनक माहिती आता समोर आली … Read more

खळबळजनक !! एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यात एका 8 वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. तर 6 वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला असून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात ही घटना घडली आहे. भल्यापहाटे हे हत्याकांड घडले आहे. … Read more

दिवाळीच्या तोंडावर नवरा-बायकोमध्ये भांडण; बायकोला चाकूने भोसकून नवऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

मुंबई । दिवाळीच्या तोंडावर पती-पत्नीमध्ये वाद शुल्लक कारणावरून वाद झाला. हा शाब्दिक वाद इतका गेला की यामध्ये पतीने रागाच्या भरात पत्नीच्या पोटात चाकू भोकसून स्वतः तळोजा रेल्वे ट्रॅकखाली आत्महत्या केली आहे. पनवेलमधल्या तळोजा इथं हा सर्व प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more

मोझांबिकमध्ये नरसंहार, ISIS च्या दहशतवाद्यांनी केला 50 जणांचा शिरच्छेद

मापुटो । दक्षिण आफ्रिकेचा देश मोझांबिकमध्ये (Mozambique) इस्लामिक स्टेट (ISIS) च्या अतिरेक्यांनी एका खेड्यातील 50 जणांचे शिरच्छेद केले. हा भयंकर नरसंहार काबो डेलगाडो राज्यातील नानजबा गावात घडला. फुटबॉलच्या मैदानात 50 जणांचा बळी घेतल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्या मृतदेहांचे तुकडे जंगलात फेकले. त्याचवेळी या गावातील महिलांचे अपहरण करून त्यांना लैंगिक गुलाम केले गेले. बीबीसी आणि डेलीमेलच्या वृत्तानुसार, गावातील … Read more

इस्लामपूरात खून का बदला खून ; एक अटक, तिघे फरार

Murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तुजारपूर येथील अर्जुन प्रल्हाद बाबर याने भाच्याच्या मदतीने अक्षय उर्फ तुकाराम अशोक भोसलेचा निर्घृणपणे खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. खून प्रकरणात मृत अक्षयचा मित्र मदन संभाजी कदम यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य संशयित अर्जुन बाबरसह त्याचा भाचा सूरज संपत गायकवाड याच्यासह अन्य एकजण फरार आहे. … Read more

पुण्यात खळबळ! युवासेनेच्या पदाधिकाऱ्याचा कोयत्याने खून

Deepak Maratkar

पुणे प्रतिनिधी । पुण्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याचा कोयत्याने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान हि घटना घडली आहे. दीपक विजय मारटकर Deepak Maratkar (वय ३६) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे ते चिरंजीव होते. Vijay Maratkar Death हाती आलेल्या माहितीनुसार, ही घटना … Read more

इम्रानच्या दाव्यांनंतरही पाकिस्तानमध्ये चाकूने वार करून करण्यात आली हिंदू डॉक्टरची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इम्रान खान यांनी सर्व दावे करूनही पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू सुरक्षित नाहीत. पाकिस्तानमध्ये आणखी एका हिंदू डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लाल चंद बागरी असे या डॉक्टरचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. सिंध प्रांतातील टंडो अलिहार येथे बागरी यांना घरात ठार मारण्यात आले. डॉनच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात लोक त्याच्या घरात घुसले … Read more

पाकिस्तानमध्ये एका 27 वर्षीय टीव्ही अँकरची गोळ्या घालून हत्या, पंतप्रधान इम्रान खान यांनी केला असा दावा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये एका महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. महिला पत्रकार शाहिनाला शनिवारी शूट करण्यात आले. शाहीना एक सरकारी टीव्ही चॅनल पाकिस्तान टीव्हीवर अँकर आणि रिपोर्टर होती. तिच्या घरात घुसून शाहीनची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर तिच्या घरी पोहोचले आणि तिने दार उघडताच त्यांनी शाहीनावर अनेक गोळ्या झाडल्या. शाहीनाला … Read more

धक्कादायक !! मेढा-मारली घाटात सापडले सांगलीच्या एकाच कुटुंबातील चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी साताऱ्यात काही वर्षांपूर्वी डॉक्टर असल्याची बतावणी करुन निरपराध लोकांना मारून टाकणाऱ्या संतोष पोळने लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली होती. लोकांची हत्या करूनही ६-७ वर्षं प्रकार उघडकीसच न येण्याची सोय सिरीयल किलर संतोष पोळने केली होती. त्याच हत्याकांडासारखी पुनरावृत्ती जावळी तालुक्यातील मेढा मारली घाटामध्ये घडली आहे. या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील … Read more

नाशिक जिल्हा हादरला; २ चिमूकल्यांसह एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन निर्घृण हत्या

नाशिक । जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील ४ जणांची अज्ञाताकडून गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हे हत्याकांड चोरीच्या उद्देशातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत असून याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुकासह संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. या घटनेचे वृत्त ‘झी २४’ तास … Read more