पुणे जिल्ह्यात दिवसभरात १७६ रुग्ण

पुणे । पुणे जिल्ह्यात आज दिवसभरत १७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात एकूण ७ हजार २६५ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मिळून इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम शिथिल केले असले तरी प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाय राबविले जात … Read more

गावी जाण्याकरिता पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती देणं भोवलं; ११ जणांवर गुन्हा दाखल

पुणे । मुंबईतून मूळ गावी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे डिजिटल पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ११ जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत राहणाऱ्या या ११ जणांना कोकण, सातारा, सांगलीत जायचे होते. मात्र, मुंबई आणि ठाणे पोलिसांकडून प्रवासासाठी डिजिटल पास मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई ते पुणे … Read more

पुण्यात पुढचे २४ तास काळजीचे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणे । गेले दोन दिवस चर्चेत असणारे ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ आज महाराष्ट्रात येऊन धडकले आहे. अरबी समुद्रातून आलेले हे चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्रातील अलिबाग पासून ५० किमी असणाऱ्या किनारपट्टीवर धडकले. शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात संथ सारी कोसळत आहेत. दुपारी जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह संततधार कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more

लॉकडाऊन इम्पॅक्ट | पुण्यातील अपंग रिक्षाचालकाच्या संघर्षाला हवाय मदतीचा हात

पुण्यातील दिव्यांग रिक्षाचालक संजय राजू काळे यांना लॉकडाऊन काळात वाढलेल्या अडचणींमुळे तात्काळ मदतीची आवश्यकता आहे.

Unlock 1.0 | पुणे शहरात काय सुरु राहणार? काय बंद राहणार? 

पुणे । देशात संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात संचारबंदीचे बरचसे नियम शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने  होणार आहेत. पुणे शहर हे  देशातील १३ सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या शहरांपैकी असल्यामुळे येथील कंटेनमेंट झोनमध्ये काटेकोरपणे संचारबंदीचे पालन केले जाणार असले तरी इतर परिसरात संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने यांच्याबरोबर काही … Read more

कोरोनामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अन्यथा – रोहीत पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  आज कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था संतुलित राहणे कठीण आहे. संचारबंदीच्या काळात ती ढासळली आहेच. पण पुढचे बरेच दिवस ती व्यवस्थित मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो आहे या परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा … Read more

शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

रुग्णांच्या देखभालीसाठी पुढे न येणाऱ्या नर्सेस, डॉक्टर्सवर आता मेस्मा अंतर्गत कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या २ महिन्यांपासून सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात राज्यभरातील डॉक्टर आणि नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचारी वर्ग हे अग्रभागी राहून काम करत आहेत. यामध्येच खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी सुरक्षेच्या कारणावरून काम करण्यास मनाई केली होती.  पुण्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इतिहासात प्रथमच खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनाही मेस्मा … Read more

धक्कादायक! पुण्यात दूध डेअरी मालकासह ११ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

पुणे । पुण्यातील हडपसर येथे एका प्रसिद्ध दूध डेअरीच्या मालकासह तेथील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे मगरपट्टा व हडपसर परिसरात एकच खळबळ पसरली आहे. सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. मागील ४ दिवसांपासून संबंधित डेअरीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानं डेअरीच्या मालकासह ११ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात … Read more