कोरोना नियमांचं उल्लंघन, बाबा पेट्रोल पंप, सेव्हन हिलचा जागृत पेट्रोलपंप प्रशासनाकडून सील…

औरंगाबाद | कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे बाबा पेट्रोल पंप आणि सेवन हिल जवळील जागृत पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे. सोमवारी रात्री साडे ९ ते १० च्या दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्ह्यात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कडक लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. … Read more

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांच्या कन्सलटिंगसाठी 10 नाही तर 2 हजार रुपये फी; मनपा प्रशासकांचे आदेश

औरंगाबाद | शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. शहरातील बहुतांश रूग्णांना खासगी रूग्णालयांतून उपचार घ्यावे लागत आहे. रूग्णांंना बाहेरून तपासण्या कराव्या लागत आहे, अशावेळी खासगी लॅबमधून चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नावाने होणारी रूग्णांची लूट थांबवा, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय … Read more

मराठवाड्यात 26 हजारांवर सक्रिय रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर

औरंगाबाद | मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे २६ हजार सक्रीय रुग्ण, तर सव्वालाखापेक्षा जास्त व्यक्ती अलगीकरणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आतापर्यंत विभागातील बाधितांची संख्या ही दोन लाखांवर गेली आहे आणि पावणेदोन लाखांवरील बाधित हे कोरोनामुक्त झाले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये रविवारी ३,९१६ नवे बाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १४३२ बाधित हे … Read more

सामान्य माणसांना मिळेल दिलासा ! पेट्रोल डिझेल लवकरच होऊ शकेल स्वस्त, यामागील कारण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली ।आजकाल पेट्रोल डिझेल (Petrol Diesel Price) चे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या देशातील बहुतेक प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑल टाइम हाई (All Time High) आहेत. आपल्याला लवकरच महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून आराम मिळू शकेल. वास्तविक, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 15 दिवसांत 10% कमी झालेल्या आहेत. युरोपमधील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे तेथे … Read more

… आता रूग्णालयातील बेडची उपलब्धता लगेच कळणार

औरंगाबाद | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना सूचना केल्या आहेत. तर रूग्णालयात बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी दोन अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मोबाईलवर संपर्क साधून अवघ्या काही मिनिटांतच बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती मिळणार आहे. शहरी भागात … Read more

धक्कादायक! औरंगाबादेत कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण; एकाच दिवसात सापडले तब्बल 1679 रुग्ण

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 558 जणांना (मनपा 464, ग्रामीण 94) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 54056 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1679 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65922 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1408 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 10458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या … Read more

कोरोना अँटीबॉडीजसह जगातील पहिल्या बाळाचा जन्म, गर्भवतीस देण्यात आला होता लसीचा पहिला डोस

baby mask

फ्लोरिडा । कोरोना विषाणूच्या संकटाच्या या काळात, अँटीबॉडीसह जगातील पहिले मूल जन्मले आहे. कोरोना विषाणूविरूद्ध एका महिलेने अँटी बॉडीज असलेल्या एका बालिकेला जन्म दिला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या महिलेस तिच्या गर्भधारणेदरम्यान कोरोना लसचा पहिला डोस दिला गेला. तथापि, या मुलीतील कोरोना विषाणूविरूद्ध हे अँटी कसे काम करते हे अद्याप संशोधनाचा विषय आहे. असे … Read more

कोरोनाने वाढविली गुंतवणूकदारांची चिंता, आज बाजारात विक्रीचे वर्चस्व; सेन्सेक्स 50 हजारांच्या खाली झाला बंद

नवी दिल्ली । वीकली एक्सपायरी (Stock Market) च्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाले आहेत. आज सकाळी सुरुवातीच्या व्यापारात चांगली खरेदी होती, परंतु दुपारी बाजारात विक्रीचा जोर कायम होता. आज दिवसभराच्या व्यापारानंतर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 585.10 अंकांनी खाली येऊन 49,216.52 च्या पातळीवर बंद झाला. त्याशिवाय निफ्टी इंडेक्स (NSE Nifty) 163.45 अंकांनी घसरला असून ते … Read more

धक्कादायक: औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात वाढले 1335 रुग्ण

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 442 जणांना (मनपा 357, ग्रामीण 85) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 52515 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61435 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1368 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7552 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या … Read more