कोरोना विषाणूची औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना झाला मोठा नफा, जाणून घ्या किती? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची औषधे बनविणारी कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ला ३१ मार्च २०२० ला समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीत २२०.३ करोड रुपयांचा नफा झाला. वर्षभराच्या पहिल्या तिमाहीतील १६१.६६ करोड रुपयांच्या तुलनेत हा नफा ३६.२८% अधिक आहे. कंपनीने शेयर बाजारात सांगितले की, या काळात त्यांचे एकूण उत्पन्न ७.९६% वाढून २,७६७.४८ करोड पर्यंत पोहोचले आहे. वर्षाच्या पहिल्या … Read more

ये क्या हुआ… अशी अवस्था झाली कोरोना झाल्यावर – मिलिंद इंगळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चार महिन्यांपासून भारतात कोरोना या विषाणूच्या साथीच्या आजाराचा कहर सुरु आहे. विविध क्षेत्रातील काही मान्यवरांना देखील या आजाराला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील एक महत्वाचे नाव म्हणजे मिलिंद इंगळे होय. मिलिंद इंगळे यांना मी महिन्यात कोरोनाचे निदान झाले होते. आता ते या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. पण … Read more

चिंताजनक! देशात गेल्या २४ तासांत सापडले १८ हजारापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली । देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्ण संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८ हजार ९५३ वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य … Read more

राज ठाकरेंच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंज येथे कोरोनाने धडक दिली. राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना कोरोना व्हायरसची Coroanvirus लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारीच राज ठाकरे यांच्या दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आता कोरोना व्हायरसने थेट राज ठाकरे यांच्या घरात शिरकाव … Read more

‘या’ टॅबलेटची किंमत कमी करावी यासाठी अमोल कोल्हे यांनी केली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. बाजारात यावरील विविध औषधे सध्या उपलब्ध होत आहेत. बऱ्याच औषधांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आहे. बाजारात सध्या फॅबिफ्लू नावाचे औषध उपलब्ध होते आहे. या औषधाची किंमत १०३ रु इतकी आहे. रुग्णाला हे औषध १४ दिवस घ्यावे लागते. पहिल्या दिवशी १८ गोळ्या आणि उरलेले दिवस रोज … Read more

१ जुलैपासून तुमचं ATMमधून पैसे काढणं पडू शकते महाग

मुंबई । ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ जुलैपासून ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन एप्रिल, मे, जून हे तीन महिने काही नियम शिथील करण्यात आले होते. मात्र १ जुलैपासून हे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे १ जुलैपासून तुमचं एटीएममधून पैसे काढणं महाग होण्याची शक्यता आहे. ATM … Read more

बिल गेट्सने चिंता व्यक्त केली,म्हणाले,”सध्या लस आपल्याला कोरोनापासून वाचवेल याची गॅरेंटी नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाचे डोळे कोरोनाव्हायरस लसीवर लागलेले आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये या लसींच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. परंतु अद्यापपर्यंत या लसीबाबत कोणतेही ठोस असे रिझल्ट्स समोर आलले नाहीत. दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे की ही लस आल्यानंतरही याची गॅरेंटी कोणाकडे नसेल कि कोरोना पुन्हा होणार नाह. बिल गेट्स आणि त्यांची संस्था … Read more

माझ्या आजारपणात बहीण पंकजा हिनं फोन केल्याचा आनंद वाटला- धनंजय मुंडे

मुंबई । राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर १० दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात असलेले मुंडे काही दिवसांपूर्वी घरी परतले असून सध्या क्वारंटाइन आहेत. क्वारंटाइन असतानाच त्यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला आणि आजारपणाचे अनुभव सांगितले. त्यात धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांनी केलेल्या … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५ लाखांच्या जवळ; २४ तासात १७ हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाबाधित रुगणांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मागील २४ तासांत कोरोनाबाधितांची एका दिवसातील सर्वाधिक, म्हणजे सुमारे १७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. या नव्या रुग्णांनंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ९० हजार ४०१ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे मृतांची संख्याही १५ हजारांच्या पुढे पोहचली असल्याची माहिती केंद्रीय … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याला दिली मंजुरी

मुंबई । महाराष्ट्रातील कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आघाडीवर कार्यरत असलेल्या आशा सेविकांना ठाकरे सरकारनं अखेर दिलासा दिला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात राज्य सरकारकडून आशा सेविकांनाही मदतीला घेण्यात आलं आहे. त्यामुळे आशा सेविकांना देण्यात येणारा मोबदला वाढवण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून केली जात होती. या मागणीवर अखेर निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य … Read more