चिंता वाढली! पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजार पार

पुणे । पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १० हजारच्या पुढंं गेला आहे. पुणे शहरासह विविध तालुक्यांमध्ये मागील १२ तासांत ५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ९ हजार ९५९ होती. त्यानंतरच्या १२ तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत मिळून ५३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला … Read more

किरकोळ कार्यकर्त्यांसारखे राजनाथ सिंग टीव्हीवर टीका करतायत – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांना उत्तर दिले आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःचे काम करण्यास अपयशी ठरल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीका करणे … Read more

चिंताजनक! जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा ७० लाख पार

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिका, ब्राझिल, रशिया, स्पेन, यूके इटली, पेरु आदी देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे घबराट पसरली आहे. भारतातही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक देशांनी कोरोनाला रोखण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही कोरोनाच्या रुग्णात सतत वाढ … Read more

मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ५० लाखांचे विमा कवच

मुंबई । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार कोरोनाशी संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य मिळणार आहे. पालिकेच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. हे विमाकवच केवळ पालिका कर्मचारी नव्हे तर कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे … Read more

राज ठाकरेंच्या ‘त्या’ प्रश्नाचं सरकारकडे तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही

मुंबई । लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शहरांत होत असलेली गर्दी व गोंधळाला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याची टीका मनसेनं केली आहे. ‘पुनश्च हरिओम’ म्हणत राज्यातील ठाकरे सरकारनं लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ जून, ५ जून आणि ८ जून अशा तीन टप्प्यांत एकेका गोष्टीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत. … Read more

आम्हाला शाळेतच जायचंय; मुलांची मागणी, ऑनलाईन शिक्षण पालक आणि मुलांना रुचेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे देश जागेवर थांबला. उद्योग, व्यवसाय ठप्प आहे. याबरोबरच शिक्षण क्षेत्रावर देखील याचे दूरगामी परिणाम होताना दिसताहेत. अनेक परिक्षा रद्द झाल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने जूनमध्ये शाळा सुरु होणार नसल्याचे दिसत आहे. आता ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे येवू लागलाय. हे … Read more

धक्कादायक! देशात केवळ ५ दिवसात कोरोनाचे ५० हजार रुग्ण वाढले

नवी दिल्ली । एकीकडे संपूर्ण देश अनलॉक होत असताना दुसरेकडे देशातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येक नवीन दिवसासह कोरोनाचे आकडे वाढतच आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाची 9983 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच लाखाच्या वर गेली आहे. चिंतेची बाब म्हणजे फक्त 5 दिवसात जवळपास 50 हजार नवीन रुग्ण … Read more

कोविड चाचण्यांत भाजपशासित राज्यांची कामगिरी वाईट;दिल्लीमध्ये होतायत सर्वाधिक चाचण्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोविडच्या तपासण्यांमध्ये दिल्ली हे राज्य खराब कामगिरी करत असल्याची टीका केली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक चाचण्या करण्यामध्ये दिल्ली हे राज्य आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे दिल्लीत सर्वाधिक ११ हजार १२४ तपासण्या होत असल्याचं चित्र … Read more

राज्यात कोरोना टेस्टचा दर निश्चित होणार- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाच्या संशयित रुग्णांकडून कोरोनाची चाचणी करण्यासाठी मनमानीपणे शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची समिती स्थापन केली असून ही समिती कोरोना चाचणीचा दर ठरवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील लॅब पूर्णक्षमतेने वापरण्यासाठी आणि … Read more

सोलापुरातील कोरोना रुग्णवाढीला शरद पवार, सुशीलकुमार शिंदेच जबाबदार- संतोष पवार 

सोलापूर । सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२१७ झाली आहे. १०० च्या जवळपास रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागला आहे. जिल्ह्यातील या सर्व परिस्थितीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेच जबाबदार असल्याचे भाजपा नेते संतोष पवार यांनी म्हंटले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शरद पवार … Read more