कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

पुण्याच्या या पठ्ठ्यानं बनवलाय चक्क सोन्याचा मास्क; किंमत २.९ लाख रुपये

पुणे । सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र काळजी घेतली जात आहे. आता संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल करून कामकाजाला सुरुवात केली जात आहे. मात्र हे करत असताना सामाजिक अलगावचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. आता आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार लोक मास्क खरेदी करत आहेत. पण पुण्यात एका इसमाने चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. पुण्यातील पिंपरी … Read more

अबब!! पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली २५ हजाराच्या घरात; ७९० रुग्णांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यात आज एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४ हजार ५५८ झाली आहे. आज पर्यंत पुणे विभागात एकूण १ लाख ८३ हजार ७९८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १ लाख ७० हजार ६९१ इतके अहवाल आले आहेत. ४१०७ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. विभागातील १ लाख ४९ हजार ६५२ नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले … Read more

पुण्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले तब्बल ६७५ नवे कोरोनाग्रस्त; ८ जणांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । मुंबईनंतर आता पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल ६७५ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. यामध्ये एकट्या पुणे शहरात ६२० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत तर पिंपरी चिंचवड मध्ये ३७ नवे रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या १२ हजार ४७४ झाली आहे. तर … Read more

पुण्यात २२२ रुग्णांची स्थिती गंभीर; ४९ जण व्हेंटिलेटरवर – महापौर

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. पुण्यातही रुग्णसंख्या वाढते आहे. त्यातच आज पुण्यातील २२२ रुग्ण गंभीर असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून सांगितले आहे. पुणे जिल्ह्यात काही परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. पुणे शहरात सध्या २ हजार ७३३ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी २२२ रुग्ण गंभीर आहेत. … Read more

पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ; दिवसभरात सापडले २६८ नवीन रुग्ण

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आज दिवसभरात राज्यात ३६०७ रुग्णांची अर्थात आतापर्यंतच्या सार्वधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज पुण्यातही मोठ्या संख्येत रुग्णांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. आज दिवसभरात पुण्यात २६८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सात रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली … Read more

पुणे जिल्हयात दिवसभरात २०५ नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४ हजार ६०३ वर

पुणे । महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ४५ हजार पार झाली आहे. मुंबई पाठोपाठ पुणे जिल्हयात रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आज एकूण २०५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ४६०३ झाली आहे. जिल्हयात केटेन्मेंट झोनसाहित इतर परिसरातही काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे. सध्या एकूण १८९२ रुग्ण विविध रुग्णालयात … Read more

पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना

पुणे । राज्यातील विविध भागातून आता हळूहळू लोक परतत आहेत. पुण्यातही गेल्या काही दिवसात परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यांमधून लोक आले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाकडून विविध उपाय राबविले जात आहेत. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सद्यस्थिती लक्षात घेऊन बाहेरून पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आलेल्या प्रत्येक नागरिकाला घरातच विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. १४ दिवस या नागरिकांना सक्तीने विलगीकरणात ठेवावे असे आदेश … Read more

पुणेकरांची चिंता वाढली; एकाच दिवसात सापडले तब्ब्ल २०२ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या ३२९५ वर

पुणे । राज्यात मुंबईनंतर पुणे शहरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात तब्बल २०२ नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याने आता पुणेकरांची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात शहरात एकूण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका ४६ वर्षीय तृतीयपंथीयाचा समावेश आहे. ताज्याकडेवारीनुसार, पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३२९५ झाली आहे. तर मृतांची … Read more

CRPF च्या जवानांची तुकडी पुण्यात दाखल; ‘या’ भागात काढला रुटमार्च

पुणे प्रतिनिधी | पुणे मनपा क्षेत्रातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ३ हजार पार गेली अाहे. शहरात सद्यपरिस्थितीत एकुण ६९ परिसर कटेंनमेंट झोन म्हणुन प्रशासनाने घोषित केले आहेत. या भागात नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव असतानाही अनेक नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे आता रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकडीला तैनात करण्यात आले असून आज त्यांनी शहरातील सहकारनगर, धनकवडी, … Read more