रशियाची ‘ती’ बहुचर्चित लस बाजारात कधी येणार? उत्तर मिळालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशियातील एका विद्यापीठानं करोनावरील पहिली लस यशस्वीरित्या विकसित केल्याचा दावा केला होता. दरम्यान, ही लस छोट्या प्रमाणात करण्यात आलेल्या मानवी चाचणीदरम्यान यशस्वी ठरली असून ती माणसांसाठी सुरक्षित असल्याचंदेखील विद्यापीठानं म्हटलं होतं. मॉस्कोच्या सेचेनोव्ह विद्यापीठानं ३८ स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या ही चाचणी केली. त्याचबरोबर, रशियन सैन्यानेदेखील सरकारी गेमलेई राष्ट्रीय संशोधन केंद्रात दोन महिन्यांत समांतर … Read more

पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यात ‘कोरोना पे चर्चा’

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांनी कोरोना साथीच्या जागतिक परिणाम या विषयावर पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास देवाणघेवाण केली. वैज्ञानिक … Read more

केंद्र सरकारच्या योजनेत फक्त तांदूळ, सरसकट सर्वाना धान्य नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । महाराष्ट्रात करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेत फक्त तांदूळ वाटपाचा समावेश आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांनाच तांदूळ मिळणार असून केशरी कार्डधारकांना केंद्राने या योजनेतून वगळलं आहे, अशी माहिती देतानाच राज्य सरकारकडून मात्र मध्यमवर्गीयांनाही ८ रुपये प्रति … Read more

कोरोनाच्या संकटात सोनिया गांधींनी पत्रातून केल्या मोदींना ‘या’ ५ सूचना

नवी दिल्ली । देशभरात करोनाचे ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. देश एका मोठ्या महामारीचा सामना करतो आहे. अशा परिस्थितीत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोनाशी लढण्यासाठी आपण निधी कसा वाचवू शकतो याबाबत ५ महत्वाच्या सूचना केल्या आहेत. करोनामुळं देशावर आर्थिक संकट तयार झालं असून मोदी सरकारने करोनाशी लढण्यासाठी आणखी कठोर निर्णय … Read more

१४ एप्रिलनंतर ग्रामीण भागातील लॉकडाउन सरकारने उठवावा- राजू शेट्टी

कोल्हापूर । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. याचबरोबर कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहन वगळता राज्यात जिल्ह्यांतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या १४ एप्रिलला घोषित केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन संपणार आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन आणखी … Read more

धक्कादायक! पोस्टमन निघाला करोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेले हजारो नागरिक ‘सेल्फ क्वारंटाइन’

वृत्तसंस्था । देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंतेत भर घालत असतांना आता ओडिशामध्ये एका पोस्टमन करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमनला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ओडिशा सरकारने भुवनेश्वरमधील हजारो नागरिकांना ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत … Read more

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

पुणे । राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे. 33 new #Coronavirus positive … Read more

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था । देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९०२ झाल्याची माहिती कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापैकी २ हजार ६५० जण करोनाबाधित असून १८३ जण आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी मागील २४ तासांमध्ये देशात … Read more

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “डॉक्टरांना त्रास देणाऱ्या मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यावर उपचार कसले करता? यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपाचार बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत म्हणे हे, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना … Read more

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लागू केला. येत्या १४ एप्रिलला हा लॉकडाउन संपणार आहे. दरम्यान, दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असताना सरकार लॉकडाउनचा कालावधी वाढवणार का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. अशा वेळी लॉकडाउनबाबत एक महत्वाची बातती समोर आली आहे. येत्या २४ एप्रिलला एकाच वेळी … Read more