भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली; गोळीबार केला नाही – भारत सरकार 

नवी दिल्ली । भारत चीन सीमेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून तणाव निर्माण झाला आहे. भारताने लडाख सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यावर चीनने त्यांचे सीमेवरील सैन्य वाढविले होते. त्यामुळे भारताने देखील आपले सैन्य वाढविले. गेले दीड महिने सातत्याने हा तणाव मिटविण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या आहेत. भारताने काही अटी चीनसमोर मांडल्या होत्या. आज भारतीय सैन्याने एलएसी … Read more

जॉर्ज फ्लॉयडनंतर अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात आणखी एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील अटलांटा येथे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका कृष्णवंशीय माणसाला एका पोलिस कर्मचाऱ्याने गोळ्या घालून ठार मारले. या घटनेच्या काही तासांनी अटलांटा पोलिस प्रमुखांनी आपला राजीनामा दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, त्या व्यक्तीने एका पोलिस अधिकाऱ्यांची टेझर बंदूक हिसकावली आणि तो पळून जात असताना त्याला गोळी … Read more

छत्तीसगड मधील सुरक्षा दलांच्या कॅम्प मध्ये जवानाकडून आपल्याच साथीदारांवर गोळीबार; २ जवानांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अमदाई व्हॅली कॅम्पमध्ये छत्तीसगड सशस्त्र दलाच्या जवानांमध्ये वाद झाला. या वेळी एका जवानाने गोळीबार केला. या घटनेत सीएएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. आमदाई व्हॅली कॅम्पमध्ये सैनिकांमध्ये भांडणे झाली. यावेळी झालेल्या हाणामारीत एका जवानानं आपल्या साथीदारांवर गोळीबार केला. सीएएफ ९ या बटालियनच्या जवानाने गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. … Read more

धक्कादायक! वेळेवर पगार न दिल्यानं नोकराचा मालकावर गोळीबार

सांगली प्रतिनिधी । पलूस येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप आनंदराव वेताळ यांच्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास गोळीबार झाला होता.मात्र या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. हल्लेखोर आरोपी सूरज सुधाकर चव्हाण याला डफळापुर येथे पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिली. पलूस येथील प्रसिद्ध … Read more

मामाचा नादचं खुळा! कोल्हापूरात भाचा स्पर्धेत पहिला आला म्हणून मामाने केला चक्क गोळीबार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर धावण्याच्या स्पर्धेत भाचा जिंकल्याचा आनंद मामाने अनोख्या पध्दतीने साजरा केला आहे. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मामाने चक्क हवेत गोळीबार केल्याची आश्चर्यकारक घटना कोल्हापुरामध्ये घडली आहे. हवेत गोळीबार करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अश्विन शिंदे असे या मामाचे नाव आहे. … Read more

जामिया विद्यापीठाजवळ अज्ञात माथेफिरू युवकाकडून मोर्चेकऱ्यांवर गोळीबार; विद्यार्थी जखमी

दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला असून, या गोळीबारात विद्यार्थी एक जखमी झाला आहे. नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राजघाटकडे मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान एका माथेफिरू युवकाने गोळीबार केला, अशी माहिती मिळाली आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असून गोळीबार करणाऱ्या संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  

किनी टोलनाक्यावर पोलिसांवर गोळीबार, कोल्हापूरात भितीचे वातावरण

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर कोल्हापूर येथील किनीटोलनाका येथे आज गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. कोल्हापूर पोलीस आणि राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक असलेले तीन आरोपी यांच्यात फायरींग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेमुळे किनीटोलनाका आणि परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण पसरले होते. हाती आलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक … Read more

नागरिकत्व सुधारणा विधेयक: आसाममध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार

गुवाहाटी | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन ईशान्य भारत धुमसत आहे. बुधवारी आसाममध्ये निदर्शने होत असताना पोलिस आणि आंदोलकांतमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सांगितले की परिस्थितीवर मात करण्यासाठी डिब्रूगडमधील पोलिसांनी आंदोलकांवर रबर गोळ्या झाडल्या आणि लाठीचार्जही केला. त्याच वेळी, गुवाहाटीमधील विद्यार्थ्यांनी मुख्य जीएस मार्ग बंद केला, त्यानंतर सचिवालयाजवळ पोलिसांशी चकमकी झाल्याचे वृत्त आहे. Assam: Protest being held … Read more

आयटीपीबी जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, ६ जवानांचा मृत्यु तर २ जण गंभीर

छत्तीसगडमधील नारायणपुर जिल्हयामध्ये इंडो-तिबेटियन बोर्डर पोलीस दलातील जवानांमध्ये झालेल्या वादविवादात जवानाने च आपल्या इतर सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये सहा जवानाचा मृत्यु झाला असून दोन जवान गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत.

नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती

नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती छत्तीसगड पोलिसांनी २०१२ मध्ये बिजापूर जिल्ह्यातील सरकेगुडा येथे केलेल्या बनावट चकमकीत १७ ग्रामस्थांना गोळ्या घालून ठार केले होते, अशी धक्कादायक माहिती न्यायालयीन चौकशीतून उघड झाली आहे. या प्रकरणी सात वर्षे सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायमूर्ती विजय कुमार अग्रवाल यांनी याबाबतचा चौकशी अहवाल मागील महिन्यात सादर केला. मात्र, रविवारी हा अहवाल लीक झाला. त्यातून ही माहिती उघड झाली आहे.