कोरोना हवेतूनही पसरतो; WHO कडून नवीन गाइडलाईन्स जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील ३२ देशातील शास्त्रज्ञांनी कोरोनाचा संसर्ग हवेतून होत असल्याचा दावा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर मान्यता देत कोरोना संसर्ग हवेद्वारे होऊ शकतो असे सांगितले आहे. जरी हे मान्य केले असले तरी यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता असल्याचे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  ही मार्गदर्शक सूची कोरोना विषाणूचा … Read more

पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील … Read more

औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा 7900 पार

औरंगाबाद प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७९०० वर गेला आहे. यापैकी ४२०० रुग्ण बरे झाले असून ३४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबादमध्ये ८ दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यु राबविण्यास आजपासून सुरुवात झाली असून १८ तारखेपर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे याचं पालन करावं अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. … Read more

सातारा जिल्ह्यात 51 नवीन कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1543 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 45, सारीचे 5 आणि आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 51 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसेच सातारा येथील एका 65 वर्षीय बाधिताचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती … Read more

कोरोनाच्या ऍक्टिव्ह प्रकरणांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुप्पट; ६२ % लोक बरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होते आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहेच पण त्याबरोबरच एक समाधानकारक बाबही समोर आली आहे. देशातील वाढत्या रुग्णांसोबत देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही चांगले दिसून येते आहे. देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६२% इतके आहे. जे कार्यरत रुग्णांच्या प्रमाणात अधिक आहे. अन्य देशांच्या तुलनेत … Read more

भारतात दररोज आढळतील २ लाख ८७ हजार रुग्ण, एमआयटी चा इशारा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. एप्रिल आणि मेच्या तुलनेत जून जुलै महिन्यात जगभरात संक्रमणाचा वेग वाढलेला असताना भारतात जर कोरोनाची लस लवकर सापडली नाही तर भारतात या आजाराची साथ भीषण रूप धारण करेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. … Read more

कोरोना विषाणू हवेतून पसरतो? जाणुन घ्या शास्त्रज्ञ काय म्हणतायत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेले काही महिने जगभर थैमान घातलेला कोरोना विषाणू कोणकोणत्या माध्यमातून संक्रमित होतो आहे यावर जागतिक आरोग्य संघटना संशोधन करते आहे. यामध्ये आता हा विषाणू हवेतून संक्रमित होत असल्याचे पुरावे हळूहळू समोर येत आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना या महामारीच्या तांत्रिक टीमच्या प्रमुख डॉ. मारिया व्हॅन … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 3149 रुग्णांवर उपचार सुरू, 166 रुग्णांची वाढ

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 92 पुरूष तर 74 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7300 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 327 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू आहेत. … Read more

सातारा जिल्ह्यात आज 11 नवे कोरोनाग्रस्त तर दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 2, प्रवास करुन आलेले 3, सारीचे 5 व आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 11 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसचे माण तालुक्यातील कन्नडवाडी व सातारा तालुक्यातील जिहे येथील बाधितांचा उपचारादरम्यान … Read more

औरंगाबादकरांसाठी अनलॉक ठरले अनलकी; ५ हजार ५१० ने वाढली रुग्णसंख्या

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद मध्ये कोरोनाचे आगमन झाले ७ मार्च पासून. ७ मार्च ला संशयीत रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून कोरोनाने शहरात जाळे पसरविणे सुरू केले. त्यानंतर लॉकडाऊनचा पहिला टप्पा २५ मार्च पासून सुरू झाला. त्यानंतर चार टप्प्यात लॉकडाऊन करून १ जून पासून अनलॉक १ आणि अनलॉक २ सुरू झाले. पण याच … Read more