केरळमधील हत्तीणीच्या हत्येवरून निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशाचे राजकारण एकीकडे आणि महाराष्ट्राचे राजकारण एकीकडे आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्यात राजकारणाचाही वेगळाच खेळ सुरु आहे. सतत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी हे जणू महाराष्ट्राला आता रोजचेच झाले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे निलेश राणे आता त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून पुन्हा एकदा बोलले आहेत. सध्या अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांचे … Read more

डीजीसीएने विमानातील मधल्या सीटसंदर्भातील नियम बदलले,३ जूनपासून लागू होणार नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्व एअरलाइन्स कंपन्यांना आता आपल्या विमानातील मधली सीट प्रवासावेळी रिकामी ठेवावी लागणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर सिविल एविएशन रेगुलेटरी डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे. मात्र, यात काही प्रमाणात सूटही देण्यात आली आहे. नव्या गाइडलाइन्समध्ये एअरलाईन्सला आता आपल्या विमानातील मधली सीट रिकामी ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे. जर हे … Read more

शेतकऱ्यांनसाठी खूषखबर! कर्जफेडीसाठी मिळाला आगस्टपर्यंतचा वाढीव कालावधी 

वृत्तसंस्था। केंद्रात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. या बैठकीत शेती व शेतीशी संबंधित उद्योगांच्या ३ लाखांपर्यंतच्या कर्जफेडीची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची … Read more

10 वी, 12 वी च्या अभ्यासक्रमाला कात्री ! 2 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार Online ‘धडे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना वाढतो आहे. देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शासन दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे. दरम्यान, असे ऑनलाईन शिक्षण देतानाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य … Read more

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत निर्णय जवळपास झाला; उदय सामंत यांची माहिती

मुंबई । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा जून महिन्यातही बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना उच्च शिक्षण खात्या अंतर्गत येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार का याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १२:३० वाजता सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा चर्चा केली. या चर्चेत … Read more

लाॅकडाउन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता – रोहित पवार

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे देशात मागील दोन महिन्यांपासून देशात संचारबंदी राबविण्यात आली आहे. यादरम्यान उद्योग व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रमुख शहरामध्ये संचारबंदी आहे. पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत प्रभावी घसरण झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारसोबत राज्य सरकार संचारबंदीचे नियम शिथिल करण्यावर विचार करत आहेत. … Read more

कोरोना रुग्णांच्या आयसोलेश वाॅर्डमध्ये कन्स्ट्रक्शन काम; नितेश राणेंनी शेयर केला व्हिडिओ

सिंधुदुर्ग । कोरोना संकटकाळात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी झाले आहे. असा डंका राणे कुटुंबीयांनी सुरु ठेवला आहे. त्यासंदर्भात ते सातत्याने आपल्या सोशल मीडियावरून विविध पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी राणे बंधूनी केईएम रुग्णालयातील मृतदेह तसेच एका रुग्णालयात रुग्णांना दिले जाणारे अन्न याचे फोटो त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेअर केले होते. आता पुन्हा एकदा नितेश … Read more

खाजगी दवाखान्यांवर आता सरकारचा ताबा; कोणत्या उपचाराकरता किती चार्ज? घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यातही महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. राज्यातील काही खासगी रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांची अक्षरशः लूट चालविली आहे. भरमसाठ बिले देऊन नागरिकांचे खिसे रिकामे केले जात आहेत. संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय-उद्योग बंद आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हे आर्थिक हाल चिंताजनक आहेत. या सर्व बाबींना लक्षात घेऊन राज्य सरकारने … Read more

झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more