‘रेल्वे बुलाती हैं’ पण महाराष्ट्र सरकार म्हणतंय ‘जाने का नहीं’.. कारण ?

वृत्तसंस्था । १ जून पासून रेल्वेची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्याचे ऑनलाईन बुकिंग ही सुरु करण्यात आले होते. बुकिंग सुरु केल्यावर दोन तासातच दीड लाख प्रवाशांनी बुकिंग बुकिंग केल्याची माहिती रेल्वेने दिली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातली आहे. तसे आदेश त्यांनी रेल्वेला पत्राद्वारे दिले आहेत. रेल्वेकडून १०० विशेष रेल्वेची यादी … Read more

भारतीय रेल्वेने जाहीर केल्या ‘या’ २० सूचना; तिकीट बुक करण्याआधी वाचायलाच हवं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संक्रमणास आळा घालण्यासाठी सुरु असलेला लॉकडाऊन आता आणखी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून भारतीय रेल्वेने काही विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत या गाड्यांची सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे चालू केलेली नाही. रेल्वेने १२ मेपासून दिल्ली ते देशातील वेगवेगळ्या राज्यात १५ जोड्गाडय़ा चालू … Read more

अखेर मोदी सरकारने उचलले ते पाऊल ज्याची सर्वजण वाट पाहत होते; काँग्रेसही म्हणाले हे बरोबर केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी कोरोनोव्हायरसच्या लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या १२ मेपासून सुरू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. चिदंबरम यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतुकीसह किरकोळ वाहतूक सुरू केली पाहिजे.” ते म्हणाले की प्रवासी आणि वस्तूंसाठी रस्ता, रेल्वे आणि … Read more

औरंगाबादच्या घटनेनंतर पवारांनी लावला थेट रेल्वे मंत्र्यांना फोन, केली ‘ही’ मागणी

मुंबई । औरंगाबाद येथे मजुरांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर या मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. पवारांनी थेट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना फोन करून या मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. आपण याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

रेल्वे मंत्रालयाचा यु-टर्न! मजुरांकडून तिकिटाचे पैसे आकारलेच नाहीत

नवी दिल्ली । काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत घरी परतणाऱ्या श्रमिकांचा रेल्वे खर्च उलचलण्याची तयारी दाखवल्यानंतर रेल्वे मंत्रालयावर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढवली. भारतीय रेल्वे नाही मजुरांकडून नाही तर राज्य सरकारकडून पैसे वसूल करत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयानं केला. गरीब आणि असहाय्य मजुरांकडून आपल्या घरी परतण्यासाठी केंद्र सरकार तिकीट खर्च वसूल करत … Read more

२५ मार्चपर्यंत देशभरातील रेल्वे सेवा बंद?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं २५ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती दिली नाही आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता … Read more

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या रेल्वे तिकिटांवरील सवलती बंद केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेत सर्व कॅटेगरीतील रेल्वे तिकिटांवरील सवलती पूर्णपणे बंद केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत, दिव्यांगजनांच्या ४ श्रेणी आणि ११ प्रकारच्या रूग्णांना मिळणाऱ्या रेल्वे तिकिटावरील सवलती कायम … Read more

जाणून घ्या, तिकिटांची विक्री करुन रेल्वे किती पैसे कमवते? आरटीआयमधून समोर आली माहिती

प्रवासी तिकिटे विकून रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत उत्पन्न 400 कोटींची घट झाली आहे. तर, याच काळात मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळणाऱ्या (रेल्वे महसूल) उत्पन्नात 2800 कोटींची वाढ झाली आहे. आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.

५० रेल्वे स्थानके, १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार

रेल्वे क्षेत्रातील खासगीकरणाला नीती आयोगाने गती दिली असून देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. ही प्रक्रिया नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सचिव स्तरावरील उच्चाधिकार समिती पार पाडेल, असा निर्णय रेल्वे मंडळाने गुरुवारी घेतला.

सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

Railway Incident

बिहार | बिहार येथे आज सकाळी सिमांचाल एक्सप्रेस या दिल्लीवरुन आलेल्या रेल्वेगाडीचे ९ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी तिच्या सर्वाधिक वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं एक पथक तातडीने या ठिकाणी पाठवलं गेलं असून रेल्वे प्रशासन ही तातडीने मदतीसाठी दाखल झालं … Read more