शिक्षक पती पत्नीच्या घरात चोरी; कराड तालुक्यात चोरट्यांचेही अनलाॅन १.० सुरु

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापूर ता. कराड गावच्या हद्दीत बंद घराचे कुलूप कशानेतरी तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व सॅमसंग कंपनीचा टीव्ही व रोख रक्कम असा एकूण 21 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल चोरणार्‍या दोन चोरट्याना कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस … Read more

आम्हाला शाळेतच जायचंय; मुलांची मागणी, ऑनलाईन शिक्षण पालक आणि मुलांना रुचेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे देश जागेवर थांबला. उद्योग, व्यवसाय ठप्प आहे. याबरोबरच शिक्षण क्षेत्रावर देखील याचे दूरगामी परिणाम होताना दिसताहेत. अनेक परिक्षा रद्द झाल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने जूनमध्ये शाळा सुरु होणार नसल्याचे दिसत आहे. आता ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे येवू लागलाय. हे … Read more

10 वी, 12 वी च्या अभ्यासक्रमाला कात्री ! 2 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार Online ‘धडे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना वाढतो आहे. देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शासन दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे. दरम्यान, असे ऑनलाईन शिक्षण देतानाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य … Read more

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत निर्णय जवळपास झाला; उदय सामंत यांची माहिती

मुंबई । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा जून महिन्यातही बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना उच्च शिक्षण खात्या अंतर्गत येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार का याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १२:३० वाजता सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा चर्चा केली. या चर्चेत … Read more

शाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar

पुणे । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

फायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच? फैसला उद्या..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयीन परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. तशी माहितीही देण्यात आली होती. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या परीक्षा रद्द कराव्यात असा विचार सुरु आहे. अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा १६ ते ३१ मेच्या दरम्यान होणार होत्या. … Read more

शाळा, महाविद्यालयं सुरु झाल्यास कसं असणार त्यांचं कामकाज? घ्या जाणून..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटकाळात शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने बैठका घेतल्या होत्या त्याचप्रमाणे या आपत्कालीन परिस्थितीत शैक्षणिक सत्राबाबत शासनाने राज्य शिक्षक परिषदेकडे काही सूचना मागितल्या होत्या. त्यानुसार परिषदेने नियोजन प्रारूप आराखडा सादर केला आहे. अशी माहिती या परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे व उपाध्यक्ष मोहन ओमासे यांनी दिली आहे. हे प्रारूप तयार करण्यासाठी … Read more

शाळा, कॉलेज उघडण्याबाबत गृह मंत्रालय म्हणते..

नवी दिल्ली । देशात कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन वाढत जाऊन चौथ्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. दरम्यान चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शहरांमधील रुग्णांची संख्या लक्षात घेत नियमांमध्ये शिथिलता देखील दिली आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडणार का? याबाबत गृह मंत्रालयाने … Read more

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

वृत्तसंस्था । देशात कोरोनाने शिरकाव केल्यांनतर देशातील राज्य आणि केंद्र सरकारनं सर्व शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारनंही केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातंर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांसह अनेक परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान आता बंद करण्यात आलेली शाळा, महाविद्यालय … Read more

वाचनाने आम्हाला काय दिलं? – भाग ६

पोटाला जेवण नसेल तरी चालेल पण डोक्याला खुराक पाहिजे. वाचनामुळे माणूस आयुष्यात प्रगती करू शकतो. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. पुस्तक हा आपला गुरू असतो कारण आपण ज्या गोष्टी वाचतो त्या आपल्याला बरेच काही शिकवतात. माणसाने आवड जपावी ती वाचनाची.