तरुणावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार; कराड शहरात वातावरण तणावपुर्ण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरातील कृष्णा नाका परिसरात असलेल्या मारुती मंदिराजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. हातगाड्यावर चिक्कीचा व्यवसाय करणार्‍या युवकावर एकाने घातक शस्त्राने वार करुन खून करण्याचा प्रयत्न केल्याचे समजत आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून हल्लेखोर फरार झाला आहे. जखमी यूवकावर कृष्णा रूग्णालयात उपचार … Read more

राष्ट्रीयकृत बँकांना टाळे ठोकण्याचा इशारा; सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्यास बँकाकडून टाळाटाळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सुशिक्षित बेरोजगारांना सरकार अनेक योजना घेवून येत आहे, मात्र राष्ट्रीयकृत बँका या सुशिक्षित बेरोजगार असणार्‍यांची हेळसांड करत असून कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहे. राष्ट्रीयकृत बँकाच्या या चुकीच्या भूमिकेविरोधात यापुढे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेकडून टाळे ठोकण्यात येणार असल्याचे संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी इशारा दिला आहे. कराड … Read more

गावठी 10 तरुण मराठा आरक्षणासाठी उपोषणाला; पाटण तालुक्यात नरेंद्र पाटीलांचे आवाहन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल स्थगिती उठत नाही आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पाटण तालुक्यातील मराठा तरुण मुले तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत, प्रत्येक गावातील कमीत कमी 10 तरुण किंवा त्यापेक्षा जास्त तरुण त्याठिकाणी उपोषणाला 10 … Read more

विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही ; मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड:- राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप कडून सतत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही अस … Read more

गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना बस स्टँडवर अटक; LCB ची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सुर्ली, ता. कराड येथील बस स्टॉपवर एकजण गावठी पिस्तूल बाळगून असणार्‍या एकास सातारा एलसीबीच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व 3 जीवंत काडतुसे असा 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच त्याच्याकडे ज्याने पिस्टल ठेवण्यास दिले तोही गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचे समजले. त्यानंतर दुसर्‍या संशयितासही वांगी, जि. सांगली येथून … Read more

पुणे-बंगळुर महामार्गावर ट्रक-स्विफ्ट कारचा अपघात; चार जण जागीच ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे स्विफ्ट कारला मोठा अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्ट कराचा चक्काचूर झाला असून अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. कराड तालुक्यात वहागाव जवळ सदर अपघात झाला आहे. कारचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना कारला अपघात झाल्याचे समजत आहे. दरम्यान, … Read more

शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृषी कायद्याच्या विरोधात आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे. कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी रास्तारोको करत कृषी कायद्यांविरोधात आपला निषेध नोंदवला. शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? असा सवाल करत चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; कृषी कायद्याच्या विरोधात उतरल्या होत्या रस्त्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करुन आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी चक्काजाम आंदोलन करणार्‍यांना ताब्यात घेतले. यामध्ये चव्हाण यांच्या … Read more

कराड : नांदगाव ग्रामपंचायतीत काका बाबा गटाला धक्का; 10 वर्षांनंतर संत्तांतर, अतुल भोसले गट विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलास काका पाटील-उंडाळकर गटाला धक्का बसला आहे. दहा वर्षानंतर नांदगाव येथे सत्तांतर झाले असून भाजपच्या अतुल भोसले गटाला विजय प्राप्त झाला आहे. नांदगाव येथे सुकरे गुरुजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील … Read more

शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशात नवीन कृषी कायद्यांवरून शेतकरी आणि केंद्र सरकार असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नवीन कृषी कायद्यांच्या अंबालबजावणीला स्थगिती देऊन कृषी कायद्यांच्या पुनर्स्थापनेसाठी एक समिती नेमली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचेच सर्वेसर्वा सदाभाऊ खोत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावी असा खोचक … Read more