मुंबईला जाण्यासाठी पास लागत नाही, पैसे द्या बाकी आम्ही मॅनेज करतो म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात जिल्हा बंदी असताना समर्थ ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ऑनलाईन बुकींग करून जादा दराने विनापासचे प्रवाशी वाहतुक करणारी चारचाकी कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथील कोल्हापूर नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतली. यामध्ये ड्रायव्हर, एजंटसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनंता उर्फ निलेश अशोक माने (वय 36 वर्षे, रा. खराडे कॉलनी … Read more

यशवंत बँकेने केली एकाच दिवशी १००० वृक्षांची लागवड…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंत बँकेने ग्रीन फ्युचर ठेव योजनेत ठेव ठेवलेल्या ग्राहकाच्या अथवा त्याने सुचविलेल्या व्यक्तीच्या नावे वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला होता. २१ जून २०२० रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधत बँकेच्या सेवकांच्या ३ टीम करून येरावळे, शेडगेवाडी (विहे) व उरुल या गावी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वड, पिंपळ, … Read more

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे द्विशतक; आत्तापर्यंत 206 जणांना डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 8 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 206 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे द्विशतक पार केले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा 17 नवीन कोरोनाग्रस्त; एकाचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 17 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून, यामध्ये खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 61 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये कराड तालुक्यातील वडगांव (उंब्रज) येथील 59 वर्षीय पुरुष, … Read more

सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या – सहकार मंत्री बाळासाहेब पाटीलS

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. श्री. पाटील म्हणाले,देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणूका दि.18 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार … Read more

पृथ्वीराज चव्हाण य‍ांनी घेतली विलासकाकांची भेट; उंडाळकरांची विधानपरिषेदवर वर्णी लागणार?

सातारा प्रतिनिधी । काँग्रेसचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विलासराव पाटील – उंडाळकर यांची सातारा येथील त्याच्या राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. पहिल्यांदाच पृथ्वीराज चव्हाण यांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन नेत्यांच्या गटात … Read more

कमराबंद चर्चेनंतर बंटी पाटील, अमित देशमुख पृथ्वीराज बाबांना घेऊन मुंबईकडे रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी मंत्री अमित विलासराव देशमुख व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची कमरबंद चर्चा झाली. मात्र या राजकीय कमराबंद चर्चेची राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे. यानंतर आता तिनही नेते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या … Read more

कराड तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आता केवळ २४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तुळसण येथील 6 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. या 6 जणांसह एकूण 9 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 194 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात आता केवळ २४ ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. त्यामुळे कराड तालुक्याची कोरोनमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे … Read more

मुलाची शाळेची फी भरण्यासाठी सावकाराकडून पैसे घेतलेल्याची फसवणूक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुलाची शाळेची फी भरण्यासाठी व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही जादा व्याजाची रक्कम झाली आहे. अजून मुद्दल बाकी आहे असे म्हणून वारंवार पैशाची मागणी केल्याप्रकरणी विनापरवाना सावकारी व्यवसाय करणार्‍या एकावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद आयाज गुलाब शेख (वय 33, रा. प्रकाशनगर, मंगळवार पेठ, कराड) यांनी … Read more

कराड तालुक्यातील घारेवाडीत सापडला मृत बिबट्या; ७२ तास उलटून गेल्याने लागल्या होत्या माशा

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील घारेवाडी येथे शिवम प्रतिष्ठान जवळ असलेल्या डोंगरात एका उताराच्या भागावर मृत अवस्थेत एक बिबट्या सापडला. सायंकाळी 5.30 ला एक धनगराला मेंढ्या घेऊन परतत असताना हा प्रकार दिसला. त्याने गावात सरपंचांना सांगितले, तातडीने वनक्षेत्रपाल विलास काळे यांना त्यांनी याची खबर दिली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विलास काळे हे पाटणहुन घटनास्थळी रवाना झाले. … Read more