महापुरा प्रमाणे कोरोनाच्या संकटात आमदार गाडगीळ झाले गायब

 सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । कोरोनाच्या संकटात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते व पदाधिकारी नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. मात्र सत्ता गेल्याचे पोटशूळ उठलेल्या भाजप पक्षाला आहे. आमदार गाडगीळ यांनी कोरोना संकटाच्या काळात किती गरजूंना अन्नछत्र सुरू केले? व्यापारपेठ सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले? ते स्वत: ‘क्वारंटाईन’ होते. त्यांच्यात हिम्मत असेल तर कोरोना संकटात कोणी काय … Read more

झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more

हुश्श! महाविकास आघाडीतील तिढा सुटला; विधानपरिषद निवडणूक बिनविरोधच

मुंबई । राज्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या निर्णयावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस पक्षाने अखेर माघार घेतली असून यामुळे महाविकास आघाडीतील तिढा सुटला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची आज बैठक पार पडली. यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध लढण्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. “विधान परिषेदेच्या ९ जागांसाठी ही निवडणूक होणार … Read more

लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ, टीका करणे हा एकमेव धंदा शिल्लक – अमोल मिटकरी

अकोला प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या लोकप्रियतेने लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ झाली आहे . काही धंदा न राहिल्याने फक्त्त टीका करणे हा आता  एकमेव धंदा शिल्लक आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे. वाधवान कुटुंबियांच्या पाचगणी प्रवासावरुन भाजप समर्थक महाविकास आघाडीवर टिका करत आहेत. यावर आता मिटकरी यांनी आपले मत व्यक्त केले … Read more

कोरोनाला तोंड देण्याची क्षमता या राज्यातील जनतेमध्ये : विश्वजित कदम

Vishwajeet Kadam

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोना विषाणू एक संकट बनून आले आहे. त्याला तोंड देण्याची क्षमता महाराष्ट्रातील जनतेत आहे. आपण सावधपणे या स्थितीला सामोरे जावू व्यक्तिगत जबाबदारी पाळू. राज्य सरकार गंभीर आहे, तुम्ही आजारांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आज केले आहे. त्यांनी याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून अफवांवर … Read more

शेती, शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प- राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यांनतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आज सादर केलेल्या राज्य अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली. शेती, शेतकरी … Read more

महाविकास बजेट २०२०: राज्य अर्थसंकल्पात महिलांसाठी सरकारने केल्या ‘या’ तरतुदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्य आर्थिक पाहणी अहवालात राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली होती. मागील तीन वर्षांतील गुन्ह्यांचे आकडे चिंता वाढविणारे आहेत. बलात्कार, विनयभंग, … Read more

‘बजेट’ महाराष्ट्राचा२०२०: कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी, आणि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. अवकाळी पावसामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू … Read more

‘बजेट’ महाराष्ट्राचा:’लाल’परीसाठी खुशखबर! १६०० नवीन एसटी बस, बस डेपो विकासासाठी ४०० कोटींची तरतूद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठया अपेक्षा असताना एसटी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात सरकार एसटीसाठी नव्या बसेस विकत घेण्यासाठी तसेच बस डेपो … Read more

योगायोग! औरंगाबाद जिल्ह्यातील २ मंत्र्यांची गावे पहिल्या कर्जमाफी यादीत

औरंगाबाद प्रतिनिधी । महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या मतदार संघातील प्रत्येकी एका गावाची कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत वर्णी लावण्यात आली आहे. दोन्ही मंत्री शिवसेनेचे नेते आहेत. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजने अंतर्गत कॅबिनेटमंत्री संदीपान … Read more