IPL मध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना दिली परवानगी, पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी होणाऱ्या न्यूझीलंडच्या सहाही खेळाडूंना, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुद्दा लक्षात घेता आरोग्याची काळजी आणि सर्व सरकारी नियम पाळण्याची जबाबदारी ही खेळाडूंवर असेल असंही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय. न्यूझीलंडच्या संघाचे सहा खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत. केन विल्यमसन … Read more

जवळपास ठरलं! यंदाची IPL स्पर्धा युएईतचं

मुंबई । देशातल्या कोरोना संकटामुळं आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन रखडला आहे. यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय प्रत्येक पर्यायांवर विचार करत आहे. यात आयपीएल स्पर्धा भारताबाहेर भरवण्यावर एकमत होताना दिसत आहे. त्यानुसार आयपीएलच्या १३ वा हंगाम युएईत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारकडून … Read more

धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या पोहोचला थेट त्याच्या रांचीच्या घरी; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर केवळ धोनीचीच हवा दिसून येते आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील … Read more

चीनी कंपन्यांसोबतच्या कोट्यावधी रुपयांच्या कराराबाबतचा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनची उत्पादने आणि चिनी कंपन्या यांच्या विरोधात संपूर्ण देशभरात विरोध केला जात आहे. आयपीएलचा प्रायोजक असलेल्या विवोबरोबरचा करार संपुष्टात आणण्यासाठी बीसीसीआयसाठी सोशल मीडियावर तीव्र दबाव आणला जातो आहे. मात्र, मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केले होते की, आयपीएलमध्ये चिनी कंपनीकडून येणाऱ्या पैशांचा फायदा हा चीनला होत नसून भारताला … Read more

आयपीएल २०२० ची मोठी बातमी, आयपीएल ‘या’ दिवसापासून सुरू होऊ शकते ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयला आपली सर्वात मोठी स्पर्धा आणि जगातील सर्वात मोठी लीग असलेली आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब करावी लागली. मात्र, आयपीएल आयोजित करण्याच्या शक्यतेने पुन्हा जोर धरला आहे. सध्याच्या कोरोनाच्या या वाईट काळात क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी अशी आहे की, ‘ बीसीसीआय २५ सप्टेंबरपासून आयपीएलचे १३ वे सत्र आयोजित करण्याचा … Read more

सचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  तेलंगणातील राचकोंडा जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली आहे. त्यांची आणि सचिनची भेट किती महत्वपूर्ण आणि भावनिक होती हे त्यांच्या फोटोखालील आशयाने लक्षात येते. त्यांचे आणि सचिन सोबत असणारे विशेष … Read more

IPL भरवण्याबाबत BCCI ने केले ‘हे’ मोठे विधान…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारकडून क्रीडा संकुल आणि स्टेडियम ​​सशर्तपणे उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र असे असूनही, बीसीसीआयने सध्याच्या परिस्थितीत आयपीएल आयोजित करण्याबाबत विचार करणे हे फार घाईचे ठरणार असल्याचे म्हटले आहे. सरकारने रविवारी ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. लॉकडाऊन असूनही, देशभरातील क्रीडा संकुले आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडता … Read more

आंतरराष्ट्रीय नर्स डेनिमित्त विराट कोहलीने नर्सेसचे मानले आभार म्हणाला,”या कठीण काळात साथ दिल्याबद्दल धन्यवाद”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराने झगडत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देशाने स्वत:ला लॉकडाऊनमध्ये टाकले आहे आणि शाळा-कार्यालयापासून ते संपूर्ण क्रीडा विश्‍व थांबले आहे. परंतु डॉक्टर व परिचारिका हे मात्र सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णालयात जात आहेत. आज आंतरराष्ट्रीय नर्स डे आहे, या निमित्ताने भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्व … Read more

इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनने केला तमिळ गाण्यावर डान्स;ए.आर.रेहमान यांनी शेअर केला तो मजेदार व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान क्रिकेटचे सर्व कार्यक्रम थांबले असून, यामध्ये खेळाडूंसह कोमेंटरी करणारेही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. कधी खेळाडू त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत चॅट करताना दिसतात तर कधी त्याच्या आयपीएल मधील संघासमवेत.यावेळी खेळाडू त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी आणि त्याच्याशी संबंधित काही मजेदार किस्से सांगताना दिसतात. पण आजकाल टिकटॉक वरही खेळाडू बरेच अ‍ॅक्टिव … Read more

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनायला आवडेल-शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशां दरम्यान क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये.अशा परिस्थितीत केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच हे दोन्हीही संघ एकमेकांविरूद्ध खेळताना दिसतात.मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध मालिका खेळवण्याची अनेकदा मागणी केली आहे,परंतु त्यांच्या या मागणीला बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय सहमती देणार नाही. अलीकडेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने … Read more