अनिल कपूरकडून ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे कौतुक; म्हणाला…

मुंबई | भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आतापर्यंत, कोरोना संक्रमित लोकांची एकूण संख्या 7,19,665 वर पोहोचली आहे. त्यापैकी 2,59,557 सक्रिय प्रकरणे आहेत तर 4,39,948 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, या धोकादायक विषाणूमुळे 20,160 लोक मरण पावले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत कोरोनासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अभिनेता अनिल … Read more

अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारची ताकीद, सरकारी कामकाजात मराठीचाचं वापर करा अन्यथा..

मुंबई । मराठी राजभाषेच्या बाबतीत राज्यातील ठाकरे सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सरकारी कामकाजात अपवाद वगळता १०० टक्के मराठीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर न केल्यास वा तसे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या निर्णयाचं उल्लंघन करणारे कर्मचारी … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याला दिली मंजुरी

मुंबई । महाराष्ट्रातील कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आघाडीवर कार्यरत असलेल्या आशा सेविकांना ठाकरे सरकारनं अखेर दिलासा दिला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात राज्य सरकारकडून आशा सेविकांनाही मदतीला घेण्यात आलं आहे. त्यामुळे आशा सेविकांना देण्यात येणारा मोबदला वाढवण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून केली जात होती. या मागणीवर अखेर निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य … Read more

ठाकरे सरकारचा चिनी भगावचा नारा! चिनी कंपन्यांसोबतच्या ५ हजार कोटींच्या करारांना स्थगिती

मुंबई । चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चीनमधील बड्या उद्योगांबरोबर नुकत्याच करण्यात आलेल्या ५ हजार कोटी रुपयांच्या ३ करारांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा झाल्यानंतर हे करार स्थगित करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मॅग्नेटीक महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील … Read more

ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी मनसेचे हॉर्न वाजवा आंदोलन

मुंबई । कोरोना संकट आणि त्यात लॉकडाऊमुळे डबघाईला आलेल्या वाहतूक व्यवसायाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेने दंड थोपटले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरुन एका अभिनव आंदोलनाने राज्य सरकारला जागे करायचे आहे. शुक्रवार १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने फक्त १ मिनिट हॉर्न … Read more

ठाकरे सरकारमुळेच मुंबई आज ICU मध्ये – राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ठाकरे सरकारमुळेच मुंबई आयसीयू मध्ये गेली असल्याचे ट्विट केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात सुरु झाल्यापासून हे टीकास्त्र सुरु आहे. सातत्याने ठाकरे सरकार या संकटकाळात उपाययोजना राबविण्यात तसेच राज्याला सुरक्षित करण्यात अपयशी ठरल्याचे राणे यांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगितले आहे. … Read more

कोरोनाच्या संकटात डॉक्टरांना प्रोत्साहन; ठाकरे सरकारने केली मानधनात वाढ

मुंबई । कोरोनाच्या लढ्यात सर्वात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टरांच्या कामाची दखल घेत राज्य सरकारनं त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत बॉण्डेड डॉक्टर आणि कंत्राटी डॉक्टर यांचे मानधनही समान केले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. डॉक्टरांच्या मानधनात वाढ केल्यामुळे कोरोना … Read more

शहीद जवान संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना ठाकरे सरकारची 50 लाखांची मदत जाहीर

सातारा प्रतिनिधी । संदीप रघुनाथ सावंत हे कराड येथील जवान ३१ डिसेंबर २०१९ रोजी नियंत्रण रेषेवरील नवशेरा सेक्टर जम्मू-काश्मीर येथे शहीद झाले होते. त्यामुळे वीरजवान संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयाची मदत जाहीर झाली आहे. ठाकरे सरकारने ही मदत देऊन सावंत कुटूंबियांना दिलासा दिला आहे. सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी, जवान यांच्या … Read more

अर्ध्यावरच डाव मोडला म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका; दानवेंचा ठाकरे सरकारला खोचक सल्ला

”तुमचा अमर, अकबर,अँथनीचा संसार चांगला चालवा. अन्यथा अर्ध्यावरच डाव मोडला असे म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका” असा कोचक सल्ला भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला दिला. राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यात सर्वपक्षीय नागरिक सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला त्यावेळी दानवेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषणातून फटकेबाजी केली.