महाविकास आघाडी सरकारने ‘महापोर्टल’ केलं बंद; ४ नव्या कंपन्यांच्या माध्यमातून होणार भरती प्रक्रिया

मुंबई । राज्यात ‘महापोर्टल’च्या माध्यमातून होणाऱ्या नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने आता हे ‘महापोर्टल’ स्थगित करत ४ नव्या कंपन्यांची भरती प्रक्रिया करण्यासाठी निवड केली आहे. निवड करण्यात आलेल्या सदर ४ कंपन्यांद्वारे पुढील ५ वर्षे पदभरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. लवकरच याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद … Read more

चंद्रपूरची 59 व्या महाराष्ट्र राज्य हिन्दी नाट्य स्पर्धेत बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 59 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाने बाजी मारली असून, चंद्रपूरच्या ‘हॅलो राधा मे रेहाना’ या नाटकाने निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह राज्यात अव्वल ठरण्याचा मान प्राप्त केला आहे. बेळगावच्या ‘भूमिका’ या नाटकाला द्वितीय तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिंतामणनगर शाखेच्या ‘रूद्राली’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. राज्याच्या सांस्कृतिक … Read more

कराडातील चौघे दोन वर्षाकरिता तडीपार; सातारा जिल्ह्यासह कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून तडीपार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी मागणारे, जबरी चोरी करणारे, सरकारी कामात अडथळा आणून जखमी करणे असे गंभीर स्वरूपाचे शरीराविरूध्द गुन्हे दाखल असलेल्या चौघांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, कराड शहरात टोळीचा प्रमुख अभिनंदन … Read more

‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा एक हजार पार’-ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

गडचिरोली | जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर १९९३ मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. सलग २७ वर्ष टिकून असलेल्या दारूबंदीला धक्का लागण्याची शक्यता बळावली असता जिल्ह्यातील १ हजार २ गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत. या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा, असे पत्र देखील या गावांनी शासनाला लिहिले आहे. सद्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे सुरु करणार 120 खास गाड्या, गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्‍या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य … Read more

बार्शीतील पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक … Read more

आइस्क्रीमवर 10 रुपये जास्त घेणे ‘या’ रेस्टॉरंटला पडले महागात, 10 रुपयांसाठी ठोठावण्यात आला 2 लाख रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सेंट्रल मधील शगुन व्हेज रेस्टॉरंटमध्ये 6 वर्षांपूर्वी आईस्क्रीम पॅकेटवर दहा रुपये जास्तीचे आकारणे महागात पडले. जिल्हा फोरमने या रेस्टॉरंटला यासाठी सुमारे 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, फोरमने ग्राहकांना नुकसान भरपाईचे आदेश देखील दिलेले आहेत. फोरमने आपल्या आदेशानुसार असे सांगितले की, 24 वर्षांपासून रेस्टॉरंटला दररोज सुमारे 40 ते 50 … Read more

सामाजिक कार्यकर्त्या ऍड.वर्षा देशपांडे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

सातारा प्रतिनीधी | केस करू नये तसेच प्रकरण मिटविण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करून कानाखाली मारल्याप्रकरणी येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात भारतिय दंड संहिता कलम 385 नुसार खंडणीचा (जुलमाने घेणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तमन्ना आमीन मुजावर (वय 28, रा. माची पेठ, सध्या रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी … Read more

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने; काय आहेत उत्सवकाळातील मुहूर्त? घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणपती किंवा गणेशोत्सव हा मराठी बांधवांसाठी विशेष जिव्हाळ्याचा सण. गणपती बसण्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात. खेड्या-पाड्यातील लोकांना एकत्र बांधून ठेवताना हा सण महत्वाची भूमिका पार पाडतो. यंदाच्या गणेशोत्सवावर मात्र कोरोनाचे सावट असल्याने अनेकांना गणरायांची प्रतिष्ठापना करण्यासंदर्भातील चिंता लागून राहिलेली आहे. अनेक ठिकाणी गुरुजी व्हिडिओ कॉलवरुन पूजा सांगणार आहेत. तर काहीजण … Read more