11 महिन्याच्या चिमुकल्याला बिबट्याने भर दुपारी तोंडात धरुन नेलं; त्यानंतर…

सांगली प्रतिनिधी | शिराळा तालुक्यातल्या तडवळे येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सुफीयान शमशुद्दीन शेख असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.या घटनेमुळे नागरिक, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गावाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील अंत्री … Read more

Breaking News : सांगली महापालिकेत “काँग्रेस – राष्ट्रवादीचा” दिग्विजय ; भाजपचे सात सदस्य फुटले

सांगली | भाजपची एकहाती सत्ता असलेल्या सांगली – मिरज – कुपवाड महानगर पालिकेच्या महापौर पदाची मुदत २१ फेब्रुवारी रोजी संपली होती. आज नवीन महापौर निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे “दिग्विजय सूर्यवंशी” यांची निवड झाली आहे. एका अर्थाने काँग्रेस, राष्ट्रवादीचा दिग्विजय झाला आहे. अतिशय रंगतदार, धक्कादायक आणि उत्कंठा शिगेला पोहचलेल्या … Read more

सांगली जिल्ह्यात यात्रा, जत्रा, ऊरुसावर घालण्यात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, शिवाय सोशल डिस्टन्ंिसगसह नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक यात्रा, जत्रा उरूसावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले. ज्या गावात यात्रा, ऊरुस भरणार आहे, त्या ठिकाणी नजर ठेवण्याचे आदेश … Read more

तेरा पानी रम्मी जुगार अड्डा पोलिस पथकाने केला उध्वस्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील कर्नाळरोडवर असणाऱ्या एका इमारतीच्या खोलीत सुरु असलेला तेरा पानी रम्मी जुगार अड्डा सांगली शहर पोलिसांच्या पथकाने उध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणाहून २१ जणांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जितेंद्र किसन पळसे याच्या ऑफिस मध्ये हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ६० हजारांचे मोबाईल, ६ हजार ४०० … Read more

पती-पत्नीचा पाझर तलावात बुडून मृत्यू; पत्नीला वाचताना पतीचाही झाला अंत

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे शिराळा तालुक्यातील भाटशिरगांव येथे अर्जुन लक्ष्मण देसाई व सुमन अर्जुन देसाई या शेतकरी दाम्पत्यांचा शेताशेजारील असणाऱ्या पाझर तलाव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली असून यामुळे संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे. भाटशिरगाव येथील अर्जुन लक्षमन देसाई यांचे पाझर तलाव जवळ शेताजवळ वस्ती आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाझर … Read more

सैन्यातील जवानाला ऑनलाईन अडीच लाखांचा गंडा

Cyber Crime

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत शहरातीत मोरे कॉलनी येथे राहत असलेले चंद्रशेखर कदम यांची ऑनलाईन पध्दतीने 2 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबतची फिर्याद चंद्रशेखर कदम यांनी जत पोलीस ठाण्यात दिली. चंद्रशेखर कदम हे अरुणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्यात दलात कार्यरत आहेत. सुट्टीमध्ये ते आपल्या जत या गावी आले होते. … Read more

शिवप्रतिष्ठानमधून नितीन चौगुलेंची हकालपट्टी; संघटनेत फुट पडणार काय?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे प्रखर हिंदुत्ववादी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेमध्ये मोठी खळबळ माजली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी कार्यवाहक नितीन चौगुले यांची शिवप्रतिष्ठान संघटनेतून हकालपट्टी केली आहे. त्यांनी ही घोषणा एका व्हिडीओ मार्फत केलेली आहे. दरम्यान शिवप्रतिष्ठानमधील अनेक दिवस खदखदत असलेला वाद यानिमित्ताने समोर आला असून याची परिणीती … Read more

म्हणुन प्रशासनाने स्वत: 1 हजार 800 लिटल भेसळीचे दूध केले नष्ट

सोलापूर प्रतिनिधी |  बाजारात विक्रीसाठी आलेले भेसळीचे 1800 लिटर दूध पंढरपूर जवळ नष्ट करण्यात आले. ही कारवाई सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने केली. भेसळ रोखण्यासाठी अनेक कडक कायदे करून दूध माफिया सर्व सामान्य लोकांच्या जीवांशी खेळत असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील शेगाव येथील सांबकांथा या खासगी दूध डेअरीवर कारवाई केली … Read more

तुला कापू का? कोंबडी म्हणते नको नको.. पहा मजेशीर व्हिडीओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे गेल्या काही महिन्यापासून बर्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का? असं म्हणताच ही कोंबडी मात्र नको नको म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे. राज्यात मराठवाडा, … Read more

अजब धाडस : मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेले; पहा Video

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आल्यानंतर अनुचित प्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ व युवकांनी अथक प्रयत्नांतून ही मगर पकडून वन विभागाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेल्याने त्यांच्या धाडसाचं कौतुक होतंय. गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुरेखा सच्चीदानंद साटपे, … Read more