धक्कादायक ! कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदल, पुरलेला मृतदेह उकरून काढला

Corona Dead Body

लातूर : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये आता रुग्णालयाचा भोंगळ कारभारदेखील समोर आला आहे. लातूर येथील गांधी चौकातील शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याची घटना समोर आली आहे. हि घटना एका नातेवाईकाच्या लक्षात आल्यानंतर चक्क एका रुग्णाचा अंत्यसंस्कारानंतर पुरलेला मृतदेह उकरून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे रुग्णालयाचा बेजबाबदारपणा … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

रात्री उशिरा गावी जायला नव्हती एसटी नंतर एकाने असा काही पराक्रम केला…

लातूर | गावांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची मोठी अडचण असते. मोठ्या शहरांपासून गावाकडे यायला फार कमी वाहने उपलब्ध असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी गावांमध्ये जाण्यासाठी सार्वजनिक वाहने मिळत नाहीत. लातूर मधील एका गावामध्ये रात्री जाण्यासाठी एसटी बस नव्हती, म्हणून एका तरुणाने बस स्थानकातून एक एसटीच पळवून नेण्याची धक्कादायक घटनेने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील … Read more

मराठवाड्यात कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट

Cotton Plant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। यावर्षी मराठवाड्यात दर वर्षीच्या तुलनेत कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  साधारण १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर क्षेत्र असताना केवळ १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण १ लाख ३१ हजार म्हणजे जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली नाही. एकूण केवळ ९२ टक्के क्षेत्रावरच लागवड झाली … Read more

धक्कादायक! कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्याने मुलाने केला डॉक्टरांवर चाकूने हल्ला

लातूर । शहरातील अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका महिलेचा कोरोनामुळे आज पहाटे मृत्यू झाला. त्याचा राग मनात धरून मृत महिलेच्या मुलाने हा चाकू हल्ला केला. यात डॉक्टर दिनेश वर्मा यांच्या छातीवर, मानेखाली आणि हातावर चाकूचे वार झाले आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती … Read more

कौतुकास्पद! रितेश आणि जेनेलियाने घेतली आहे अवयव दानाची शपथ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सोशल मीडियावर सतत कार्यरत असणारे जेनेलिया आणि रितेश देशमुख हे नेहमीच आपले सामाजिक भान जपताना दिसून येतात. समाजातील अनेक मुद्द्यांवर ते संवेदनशीलपणे आपले मत मांडत असतात. मदतीचा हात पुढे करत असतात. त्याचबरोबर ते अनेक समाजोपयोगी कार्याशी जोडलेले देखील आहेत. आज आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून जेनेलियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

लातूरचे प्रेमीयुगुल बीड बसस्थानकात पकडले

बीड, प्रतिनिधी नितीन चव्हाण : बसस्थानकामध्ये अल्पवयीन मुलगा आणि मुलगी संशयास्पद दिसून आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता सदरील हे अल्पवयीन जोडपे पळून आल्याचे उघडकीस आल्यानंतर याची माहिती लातूर पोलिसांना कळविण्यात आली होती. शिवाजीनगर पोलिसांना बीड बसस्थानकामध्ये एक मुलगा आणि मुलगी दिसून आले. या दोघांच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यांना … Read more

लातूर जिल्ह्याचे विभाजन; उदगीर नवीन जिल्हा होणार ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरु झाले आहेत. लातूर जिल्ह्याचे विभाजन होऊन उदगीर या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास उदगीर हा महाराष्ट्रातील ३७ वा जिल्हा ठरेल. या आधी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. पालघर हा ३६ वा … Read more