महाराष्ट्राच्या लाॅकडाउन नियमावलीत मुख्यमंत्री ठाकरेंकडून सुधारणा; ‘हे’ आहेत नवीन नियम

मुंबई । केंद्र सरकारने १ जूनपासून संचारबंदीचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. सोबत काही नियम शिथिल केले आहेत. तसेच राज्यांना त्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने आज या नियमांमध्ये सुधारणा करीत ते जाहीर केले आहेत. सुधारित नियमांमध्ये शारीरिक बाह्य क्रियाकलापांना परवानगी असलेली दुकाने उघडणे, खाजगी कार्यालये पुन्हा सुरू करणे, वर्तमानपत्र विक्री, शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती, … Read more

‘हे’ यश शिवरायांचे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणार्‍या प्रत्येकाचे’ – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. या यादीत ७६.५२ % पसंती त्यांना मिळाली आहे. त्यांचा या यादीत पाचवा क्रमांक लागला आहे. आयएएनएस आणि सी व्होटर यांनी संयुक्त रित्या हे सर्वेक्षण केले आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून सर्वांचे आभार मानले … Read more

आम्ही ठाकरे सरकारच्या सोबत; अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यात आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्र गेल्या २ दिवसांपासून निसर्ग चक्रीवादळाच्या भीतीच्या छायेखाली आहे. आता हे वादळ महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकत आहे. महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे नुकसान होते आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव … Read more

दूरदर्शनवर भरणार शाळा? राज्य सरकारने केंद्राकडे मागितली वेळ

नवी दिल्ली । राज्यातील कोरोना संकट अद्याप स्थिर आहे. त्यामुळे दरवर्षी १५ जूनला सुरु होणाऱ्या शाळा यावर्षी संचारबंदीनंतर कधी सुरु करायच्या यावर शासन विचार करत होते. राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी काही दिवसापूर्वी यासंदर्भात एक आढावा बैठकही घेतली होती. या बैठकीत राज्यातील शाळा १५ जूनला सुरु होण्याची कोणतीच शक्यता वर्तविण्यात आली नव्हती. मात्र एका मुलाखतीत मुख्यमंत्री यांनी … Read more

मुंबईत आरोग्य सेवेचे तीन तेरा; राणे बंधूनी शेअर केले ‘हे’ दोन फोटो 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल चढविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही वादालाही बळी पडत आहेत. मात्र ते सातत्याने आपल्या ट्विटर अकॉउंट वरून आघाडीसारकारविरोधात बोलत आहेत. नुकताच नितेश राणे यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातील मृतदेहांचा फोटो शेअर केला आहे … Read more

शरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय? राम कदमांचे सरकारवर ताशेरे

मुंबई । महाराष्ट्र सरकार निष्फळ आहे असे अनेक भाजपा नेते यांनी याआधी विविध माध्यमातून मांडले आहेच. आता त्यामध्ये भाजपाचे वादातीत नेते आणि घाटकोपर पश्चिम चे आमदार राम कदम यांचीही भर पडली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इथे अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना तुम्हांला खुर्चीचा कसला विचार पडतो … Read more

झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more

टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरु होणार; मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई  । कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी जास्तीत सुरक्षा पाळली जात आहे. इतर व्यावसायांच्या बंदी सोबत चित्रपट, मालिका व्यवसायही या काळात बंद आहेत. त्यामुळे अनेक मालिकांचे जुने भागच दाखविले जात आहेत. तर सिनेमांचे शुटिंगही रखडले आहे. मात्र आता लॉकडाऊन ४ मध्ये संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. ज्याद्वारे टप्प्याटप्प्याने सर्व उद्योग व्यवसाय करण्याचा विचार राज्य प्रशासन करत आहे. … Read more

सोलापुरात कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ; शिवसेना जिल्हाप्रमुखांचे मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

सोलापूर प्रतिनिधी ।  संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संसर्गाने बेजार झाला आहे.या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत.सोलापुरातसुद्धा कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कोरोनाने सोलापुरात आजपर्यंत २२ जणांचे बळी घेतले आहेत.असे असताना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मात्र कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोलापुरात “कोविड १९” चे केंद्र सुरू … Read more

राज्याची अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मोठी घोषणा होणार? मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली विशेष मंत्र्यांची बैठक

मुंबई । कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुले संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. नुकतेच केंद्र सरकारने देशाची आर्थिक घडी पूर्ववत बसवण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा करत २० लाख कोते रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले. आता राज्य सरकार हि अशाप्रकारची एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोजक्या मंत्रांची एक बैठक बोलावली … Read more