“राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही”; रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. “राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही,” … Read more

व्हिडिओ रेकॉर्ड करुन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश सापते यांची आत्महत्या

Rajesh Sapate

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश सापते यांनी आत्महत्या केली आहे. राजेश सापते यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये काम करत असताना लेबर युनियनचा एक पदाधिकारी आपल्या त्रास देत असल्याचे … Read more

मित्रांच्या मदतीने प्रेयसीचे बनवले आक्षेपार्ह व्हिडिओ, ब्लॅकमेल करून सर्वांनी केले सामुहिक अत्याचार

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी अत्याचार केले आहेत. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. आपली बदनामी होईल म्हणून या तरुणीने याची कुठेच वाच्यता केली नव्हती. मात्र अखेर त्यांच्या या त्रासाला कंटाळून तिने अखेर … Read more

पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीस्वाराने पोलिसाला नेलं फरफटत ( Video)

Crime

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एका दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून पोलीसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. काय आहे प्रकरण या प्रकरणात जखमी पोलिसाने आरोपीची दुचाकी अडवून … Read more

कोरोना सेंटरमध्ये दाखल करुन घेण्यासाठी पैसे मागणार्‍यांविरोधात तक्रार दाखल करा – सहाय्यक पोलिस आयुक्त कवडे

DYSP sagar Kawade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासनाने सर्व कोविड सेंटरला सक्त ताकीद दिली असून, कोणीही शासनाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी पैसे घेऊ नये असे म्हटलेले आहे. तरीही, महापालिकेच्या एका कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांनी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार चिंचवड येथे उघडकीस आला आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात रुग्णांना विनाशुल्क दाखल केले जात असताना … Read more

तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला तरीही त्याच्यावर आजच्या आज कारवाई होणार; फडणवीसांच्या तक्रारींवर अजित पवारांचे आश्वासन

Ajit Pawar Devendra Fadnavis

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत तृतीयपंथीय व्यक्तीला फसवल्याची एक बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. याबाबत आज विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवडच्या एका कार्यकर्त्याने हि खोटी बातमी व्हायरल केल्याचा आरोप केला. यानंतर फडणवीस यांच्या तक्रारीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे असेल तर तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला तरीही त्याच्यावर … Read more

डेटिंग ॲपवरून मैत्री करून ती लॉजवर बोलवायची, त्यांनतर करायची असं काही…

Dating App

पिंपरी – चिंचवड | टिंडर आणि बंबल अश्या वेगवेगळ्या डेटिंग ॲपवरून मुलांशी मैत्री करून त्यांना डेटला बोलवून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध पडल्यानंतर त्या मुलांना लुबाडणाऱ्या तरुणीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून 289 ग्राम सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा पंधरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तिने एकूण 16 … Read more

धक्कादायक! कोरोनाबाधित व्यक्तीचा हॉस्पिटलच्या शोधात दुचाकीवरून पुणे शहभर प्रवास

पुणे । पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांची संख्या तुलनेने वाढते आहे. या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड असल्याचे सांगितले जात असतानाच, एक कोरोनाबाधित व्यक्ती स्वतः दुचाकीवर फिरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हॉस्पिटलमध्ये जागा शोधत असल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. अखेरीस शनिवारी सायंकाळी त्या व्यक्तीला पिंपरी-चिंचवडमधील एका हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली. निगडी परिसरात राहणारी … Read more

पुण्यात दिवसभरात सापडले ८२४ रुग्ण; एकुण रुग्णसंख्या २८,९६६ वर

पुणे । पुण्यात आज ४७ रुग्ण आढळून आले आहेत तर पुणे महापालिका परिसरात एकूण ५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात आज २५७ नवीन रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात एकूण ८२४ रुग्ण आढळून आले यासोबतच आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८,९६६ झाली आहे. पुण्यातील रुग्ण २४२२, महापालिका परिसरातील रुग्ण २२७५६ तर पिंपरी चिंचवड … Read more

पुण्यात कोरोनाचा धुमाकुळ! दिवसभरात सापडले ८५२ रुग्ण 

पुणे प्रतिनिधी । पुणे शहारत रविवारी दिवसभरात ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता पुणे शहरातील एकूण रुग्ण २१ हजार ५२० इतके झाले आहेत. रविवारी एकूण १२ रुग्ण मृत झाले. आतापर्यंत पुण्यात एकूण ७१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील १३ हजार १०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या … Read more