मोदी सरकार देतेय स्वस्तात सोने; समजून घ्या कसा कमवायचा नफा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सॉव्हरेन सोन्याच्या बाँडच्या पुढील सीरीजविषयीची माहिती दिली आहे. आरबीआयने यासाठी प्रति ग्रॅम ४,६७७ रुपये निश्चित केले आहेत. सॉव्हरेन गोल्ड बाँड २०२०-२१ ची तिसरी सीरीज आजपासून सुरु होत आहे. १२ जूनपर्यंत गुंतवणूकदारांना या योजनेत सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय बँकेने एप्रिलमध्येच जाहीर केले होते … Read more

मोदी सरकारचं धोरणं सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच मारून टाकण्यासारखं- भारतीय मजदूर संघ

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांविरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघात फूट पडल्याचं समोर येतं आहे. आर्थिक सुधारणांच्या नावावर सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण आणि गुंतवणुकीच्या निर्णयांना विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रीय स्वसंसेवक संघ (RSS) शी संबंधीत श्रमिक संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाकडून देशव्यापी ‘सेव्ह पब्लिक सेक्टर सेव्ह इंडिया’ आंदोलन सुरू करण्यात येतं आहे. भारतीय मजदूर संघ (BMS) कडून पंतप्रधान … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या महिन्यापासून खात्यात जमा होणार किसान योजनेचे २ हजार रुपये; लिस्ट मध्ये तुमचे नाव चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकर्‍यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याची योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजेच,२ महिन्यांनंतर मोदी सरकार आपल्या खात्यात आणखी २००० रुपये जमा करतील. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. पीएम-किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी … Read more

महाराष्ट्राच्या लाॅकडाउन नियमावलीत मुख्यमंत्री ठाकरेंकडून सुधारणा; ‘हे’ आहेत नवीन नियम

मुंबई । केंद्र सरकारने १ जूनपासून संचारबंदीचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. सोबत काही नियम शिथिल केले आहेत. तसेच राज्यांना त्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने आज या नियमांमध्ये सुधारणा करीत ते जाहीर केले आहेत. सुधारित नियमांमध्ये शारीरिक बाह्य क्रियाकलापांना परवानगी असलेली दुकाने उघडणे, खाजगी कार्यालये पुन्हा सुरू करणे, वर्तमानपत्र विक्री, शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती, … Read more

लोकल ट्रेन सुरु करा! जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारकडं मागणी

मुंबई । अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारनं मुंबईतील लोकल गाड्या काही प्रमाणात सुरू कराव्यात, अशी मागणी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्रीजितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारला केली आहे. येत्या ८ तारखेनंतर लॉकडाऊन आणखी शिथिल होणार असून मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी देखील लोकल काही प्रमाणात सुरू असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याचा विचार … Read more

डीजीसीएने विमानातील मधल्या सीटसंदर्भातील नियम बदलले,३ जूनपासून लागू होणार नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्व एअरलाइन्स कंपन्यांना आता आपल्या विमानातील मधली सीट प्रवासावेळी रिकामी ठेवावी लागणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर सिविल एविएशन रेगुलेटरी डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे. मात्र, यात काही प्रमाणात सूटही देण्यात आली आहे. नव्या गाइडलाइन्समध्ये एअरलाईन्सला आता आपल्या विमानातील मधली सीट रिकामी ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे. जर हे … Read more

शेतकऱ्यांनसाठी खूषखबर! कर्जफेडीसाठी मिळाला आगस्टपर्यंतचा वाढीव कालावधी 

वृत्तसंस्था। केंद्रात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. या बैठकीत शेती व शेतीशी संबंधित उद्योगांच्या ३ लाखांपर्यंतच्या कर्जफेडीची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची … Read more

10 वी, 12 वी च्या अभ्यासक्रमाला कात्री ! 2 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार Online ‘धडे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना वाढतो आहे. देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शासन दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे. दरम्यान, असे ऑनलाईन शिक्षण देतानाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य … Read more

मोदी सरकारचे २० लाखांचे पॅकेज म्हणजे देशवासियांची क्रूर चेष्टा- सोनिया गांधी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरस आणि देशातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सगळ्या विरोधी पक्षांसोबत आज बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची देशवासियांची चेष्टा आहे. देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र … Read more