मुख्यमंत्री अन् पवार साहेब हे संजय राठोडांचा राजीनामा घेतील; विनोद तावडेंनी व्यक्त केली अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आज वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल आणि मुख्यमंत्री व पवार साहेब … Read more

घरातील कामे करणे ही फक्त पत्नीची जबाबदारी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई | पती म्हणजे एका पत्नीचे सर्वस्व! त्याला खुश ठेवण्यासाठी पत्नीचा जन्म असतो, असे आपली पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये शिकवले जाते. यामुळे पत्नीने पतीचे सर्व कामे करणे बंधनकारक आणि कर्तव्ये समजून करणे बंधनकारक असल्याचे समाजामध्ये रूढ झाले असल्याचे पाहायला मिळते. अश्यातच एखाद्या पत्नीने, पतीने सांगितलेले काम करणे नाकारले तर पती कुठल्याही थराला जाऊ शकतो. पत्नीने चहा … Read more

राज्यात एका भगिनीचा जीव गेला, सगळा महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. वनमंत्री संजय राठोड यांचं नावं सतत त्या प्रकरणाशी जोडलं जातंय. या प्रकरणावर १५ दिवस मौन धरल्यानंतर राठोड यांनी काल पोहरादेवी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत बदनामी केली जात असल्याचा दावा केला. मात्र, राज्यात करोनाचं संकट गडद होत असताना राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून आता … Read more

अहमदनगरचे नावं बदलून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर” करा; भूषणसिंह राजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  तिकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केलं.त्यानंतर महाराष्ट्रात देखील औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा किंवा उस्मानाबादचे धाराशिव करा या मागण्या जोर धरू लागल्या होत्या. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आले म्हणजे हमखास औरंगाबाद आता संभाजीनगर होईल अशी शक्यता नामांतर वाद्यांना वाटू लागली होती. पण नुकतीच अजून एका जिल्ह्याचे नाव … Read more

हा तालुका माझ्या आई – बापाने मोठ्या कष्टाने उभा केलाय; इथे तुमचे झेंडे लागू देणार नाही

औरंगाबाद | कन्नड हा तालुका माझे वडील स्व. रायभान जाधव व मातोश्री तेजस्विनी जाधव यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला तालुका आहे या ठिकाणी तुमच्या सारख्यांचे झेंडे लागू देणार नाही, असा इशारा देत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन जाधव हे जेल मधुन सुटून आल्यावर काल एका … Read more

डेअरी व्यवसायाकरिता देशभर फिरण्यासाठी विकत घेतले चक्क हेलिकॉप्टर !

भिवंडी | महाराष्ट्रामधील भिवंडी येथील एका उद्योजक शेतकऱ्याने आपल्या डेअरी व्यवसाय वाढीसाठी, देशभर करण्याकरिता हेलिकॉप्टर विकत घेतले आहे. जनार्दन भोईर असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी नुकताच डेअरी व्यवसाय सुरू केला आहे. भोईर यांचा शेतीसह बांधकामाचा व्यवसाय सुद्धा आहे. डेरी व्यवसायाच्या वाढीसाठी देश यात्रा करावी लागत असल्यामुळे यात्रा सुखकर व्हावी यासाठी 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर विकत … Read more

Success : कधीकाळी फीसाठी देखील पैसे नव्हते म्हणून फ्री शाळेत शिकली, मात्र आज चालवते आहे स्वत: ची ऑटोमेशन कंपनी

नवी दिल्ली । असं म्हणतात की प्रतिभा असेल कोणालाही थाम्बवणे शक्य नसते. ती स्वत: च आपला मार्ग बनवत असते. अशीच एक गोष्ट आहे काजल प्रकाश राजवैद्य यांची, ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला या शहरात झाला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजेच सन 2015 मध्ये, काजलने सर्व संघर्ष, अडचणी आणि त्रासांचा सामना करत ‘काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्यूशन … Read more

गावठी 10 तरुण मराठा आरक्षणासाठी उपोषणाला; पाटण तालुक्यात नरेंद्र पाटीलांचे आवाहन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल स्थगिती उठत नाही आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पाटण तालुक्यातील मराठा तरुण मुले तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत, प्रत्येक गावातील कमीत कमी 10 तरुण किंवा त्यापेक्षा जास्त तरुण त्याठिकाणी उपोषणाला 10 … Read more

अबब! तब्बल 50 लाखांची म्हैस! जाणून घ्या किती देते दूध…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्हशींच्या दुधाला चांगलीच किंमत असते. म्हणून म्हशीच्या किंमतीसुद्धा महाग असतात. सामान्य शेतकऱ्याने विचार केल्यास एका म्हशीची किंमत किती असू शकते? एक लाख? दोन लाख? की पाच लाख?? पण हरियाणातील एका म्हशीची किंमत 50 लाख आहे. वाचून थक्क झालात ना? पण ही सत्य गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया या म्हाशीबद्दल… … Read more

उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची लॉबिंग? अजित पवार म्हणाले..

मुंबई । काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याच्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठीचा प्रस्ताव असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या … Read more