Indian Railway: आता ट्रेनमध्ये आपले आवडते पदार्थ उपलब्ध होणार, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने सुरू केली E-Catering Service

Indian Railway

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने गाड्यांमध्ये ई-केटरिंगची सेवा पूर्ववत केली आहे. तथापि, ही सुविधा केवळ निवडक स्थानकांवर सुरू केली जाईल. ज्या स्थानकांवर ई-कॅटरिंगची सेवा दिली जाईल तेथे केंद्र आणि संबंधित राज्य सरकारच्या सर्व आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन केले जाईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एसी बोगीमध्ये गाड्या, ब्लँकेट, उशा आणि चादरी … Read more

खळबळजनक! जपान मध्ये सापडले ब्रिटनहून अधिक घातक कोरोना विषाणू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  ब्राझील मधून जपानमध्ये आलेल्या चार प्रवाशांमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रकार आढळून आला असून त्याची पुष्टी जपानच्या आरोग्य मंत्रालयाने केली आहे. वरील चार प्रवासी ब्राझीलच्या ॲमेझॉन राज्यातील आहेत. सध्या आढळून आलेल्या नवीन विषाणू वरती औषध शोधून काढण्याचे काम जपानच्या आरोग्य मंत्रालयाने हाती घेतलेले असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली. https://t.co/UhXlj2YvnG?amp=1 कोरोनाचे जे नवीन विषाणू … Read more

कोविड -१९ लससाठी खास फ्रीझर तयार करणार आहे ‘ही’ स्थानिक कंपनी, त्याची किंमत किती असेल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । गोदरेज अप्लायन्सेस (Godrej Appliances) जानेवारी महिन्यापर्यंत ही लस साठवण्यासाठी खास प्रकारचे फ्रीझर आणणार आहे. लस या फ्रीजरमध्ये -70 डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षा कमी तापमानात ठेवली जाऊ शकते. एका मीडिया रिपोर्टमध्ये बुधवारी कंपनीच्या हवाल्याने याबाबत माहिती देण्यात आली आहे. हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी मागणी पूर्ण करण्यास मदत करेल. जानेवारीत सुरू झाल्यानंतर कंपनी … Read more

आणखी 6 महिने ‘या’ लोकांना मिळणार पीएम गरीब कल्याण पॅकेजच्या 50 लाख रुपयांच्या मोफत विम्याचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Government- of India) मंगळवारी 15 तारखेला सांगितले की, कोरोना विषाणूशी लढा देणार्‍या आरोग्य कामगारांसाठी पंतप्रधान गरीब पॅकेज विमा योजना पुढील सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. या योजनेत सामुदायिक आरोग्य कर्मचार्‍यांसह आरोग्य सेवा देणाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यांना कोविड -१९ रुग्णांशी थेट संपर्क साधावा लागतो … Read more

खुशखबर! एका माणसाच्या शरीरात आपोआप बरा झाला HIV, निर्माण झाला आशेचा किरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात अशी पहिलीच घटना समोर आली असून जिथे एचआयव्हीवर कोणताही उपचार न करताच बरा झाला आहे. एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीने हा विषाणू पूर्णपणे नष्ट केला आहे आणि आता ही संक्रमित व्यक्ती एकदम ठीक आहे. शास्त्रज्ञांना या प्रकरणामुळे नुसते आश्चर्यच वाटलेले नाही तर ते त्याला एचआयव्हीच्या उपचारासाठीचा एक महत्त्वाचा दुवा म्हणूनही मानत … Read more

बार्शीतील पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील … Read more

पाठदुखीला इलाज करण्यासाठी हि सात योगासने आहेत महत्वपूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा पाठीच्या तक्रारी सतत सुरु असतात. अनेक महिलांनाच नव्हे तर पुरुषांना सुद्धा पाठीचा त्रास जाणवायला सुरुवात होते. पाठीच्या दुखण्यामुळे अनेक वेळा कोणतेच काम करावेसे वाटत नाही. स्वभाव चिडचिडा होतो. आणेल वेळा साधा पाठीचा त्रास सुद्धा मोठ्या आजाराचे कारण ठरू शकते. आपल्या पाठीच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात. वरच्या दिशेने ताणले जाणे, … Read more

सार्वजनिक अन् घरगुती गणेशोत्सवासाठी मुर्तीची उंची ठरली, सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई । गणेशोत्सव म्हणजे सर्वांचा लाडका सण आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अत्यंत महत्व आहे. यंदा जगभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. यावर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करता येणार नाही आहे. सरकारने गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक अलगावचे नियम पाळण्याची अट घातली आहे. सोबत गणेशमूर्तीच्या संदर्भात काही निर्देशही घालून … Read more

सोशल मीडियाचा आरोग्यावर होतो आहे विपरीत परिणाम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो आहे. मात्र मोठ्या प्रमाणात सोशल  प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी लोक गेले आहेत. त्याचे पडसाद शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर उमटत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य करताना सोशल मीडियाचा आपल्या आहारावर होणारा परिणाम या विषयावरसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. ‘आपण कसे दिसतो’ याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या … Read more