पाचगणीत दुकाने उघडण्याबाबत सर्व व्यापारी रस्त्यावर; प्रशासनाविरोधात आंदोलन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाचगणीत कोरोनाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी येथील बाजारपेठांमध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने कोरोनाच्या निर्बंधांमुळे अद्यापही बंदच ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. मात्र, इतर व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा … Read more

बच्चू भाऊ स्वयंपाक्याच्या कानाखाली मारणे सोपे; कधीतरी व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस दाखवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू ह्यांनी सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर जिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याने मेसमध्ये जात त्याची तपासणी केली. याच मेसमध्ये असलेल्या सुनिल मोरे ह्या कंत्राटी स्वयंपाक्याच्या कानाखाली मारले. ही बाब संतापजनक असून आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पातळी सोडून दादागिरीचा पुरावा आहे. स्वयंपाकाच्या कानाखाली मारणे सोपे असते. गोरगरीब माणसाला मारून … Read more

… आता रूग्णालयातील बेडची उपलब्धता लगेच कळणार

औरंगाबाद | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना सूचना केल्या आहेत. तर रूग्णालयात बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी दोन अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मोबाईलवर संपर्क साधून अवघ्या काही मिनिटांतच बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती मिळणार आहे. शहरी भागात … Read more

कुलूप लावलेले “कोविड सेंटर” पुन्हा होणार सुरू; कोरोना रुग्णांची प्रचंड वाढणारी संख्या ठरली कारणीभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (धुळे प्रतिनिधी) | कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढू लागली असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा,शिरपूर आणि धुळे या ठिकाणी कुलूपबंद केलेली कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी एकूण ४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत तर मंगळवारी ६५ अहवाल पॉझीटिव्ह … Read more

बा विठ्ठला ! कोरोना मुळे यंदाची माघी वारी देखील रद्द

सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना … Read more

सावधान ! बीडमध्ये कोरोना चाचण्या अत्यल्प, केवळ २०३ जणांच्या तपासणीत २८ पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र | शेख अनवर राज्यभरातील काही शहरात कोरोना झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा शासन-प्रशासन व्यवस्थेसह सर्वसामान्यांची चिंता वाढली असून जास्तीत जास्त कोरोना तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या कमी होत असल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली असतानाच काल केवळ २०३ संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २८ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले … Read more

परभणीतील मूरुंबा गावात पुन्हा 900 कोंबड्या बर्ड फ्ल्यू मुळे मृत्युमुखी

Bird Flu

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे जिल्ह्यातील मुरुंबा येथे मागील गेल्या चार दिवसापूर्वी मृत पावलेल्या 900 पेक्षा अधिक कोंबड्या ह्या बर्ड फ्लू च्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावातील 5550 जिवंत कोंबड्या पाच फूट खोल खड्ड्यांमध्ये पुरुन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आहे. त्यासाठी … Read more

विक्रेत्याच्या तक्रारीवरून तुमचे रेशनकार्ड रद्द किंवा निलंबित केले जाऊ शकते? अशाच प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

नवी दिल्ली । नुकतेच झारखंडच्या चत्रा येथे पीडीएस डीलरच्या तक्रारीवरून 22 रेशनकार्डधारकांचे लायसन्स रद्द करण्यात आले. राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाने डीलरच्या तक्रारीचा तपास न करता 22 कार्डधारकांचे रेशनकार्ड रद्द केले. ही तक्रार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि पुन्हा तपासणी केली असता असे दिसून आले की, या ग्राहकांनी धान्याच्या वितरणामध्ये व्यापाऱ्यावर अनियमिततेचा आरोप केला होता. या कारणास्तव, … Read more

मोठी बातमी! औरंगाबाद मध्ये कर्फ्यू जाहीर; १० ते १८ जुलै दरम्यान संचारबंदी जारी

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू जाहीर करण्याचे ठरविले आहे. दिनांक १० जुलै ते १८ जुलै  या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू असणार आहे. आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत … Read more

जिल्हा प्रशासन अन् स्थानिक लोकप्रतिनिधी रत्नागिरीचा सत्यानाश करतायत – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी खासदार निलेश राणे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून ते नेहमी कार्यरत असतात. कोकणात सध्या कोरोना सोबत नुकत्याच येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासन व स्थानिक लोप्रतिनिधींनी रत्नागिरी जिल्ह्याचा सत्यानाश करतायेत असा आरोप करत कोकण आयुक्ताना पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून … Read more